पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत राजकीय घडमोडीना वेग आला आहे. बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. एकाच आठवड्यात तीन आयएएस आणि १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यपालांनी सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ आपल्या नवीन पदांचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बदल्या आणि नेमणुकांसंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले आहेत.
कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाने १२ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार तीन आयएएस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी युनिस रिशीन इस्माईल यांची आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात वरिष्ठ विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागात विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून कार्यरत होते.
आयएएस (IAS) अधिकारी नवीन कुमार चंद्र यांची अन्न व पुरवठा विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी जनसंपर्क आणि माहिती तंत्रज्ञान विभागात ओएसडी म्हणून काम पाहिले होते. २०१९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी पी. प्रमोद यांची पुरवठा आणि पुरवठा विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डीआयजी सीआयडी म्हणून कार्यरत असलेले सोम दास मित्रा यांची कोलकाता पोलिसांच्या सह पोलीस आयुक्त (गुन्हे) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप सरकार यांची कोलकाता पोलीस मुख्यालयात सह पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही. एस. आर. अनंतनाग यांची कोलकाता पोलिसांच्या दक्षिण विभागाचे डीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदीप कुमार यादव यांच्याकडे कोलकाता पोलीस उत्तर विभागाच्या डीसी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलीस दलात सीआयएफ म्हणून कार्यरत असलेले प्रशांत चौधरी यांची कोलकाता पोलीस पूर्व विभागाच्या डीसी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. एसबी आसनसोल दुर्गापूर पोलीस दलात डीसी म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी राणा मुखर्जी यांच्याकडे पूर्व सिलीगुडी पोलीस दलाच्या डीसी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंदन घोष यांची सुंदरबन पोलीस मुख्यालयात अतिरिक्त एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.