Gyanesh Kumar Saam TV
देश विदेश

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Gyanesh Kumar Padma Bhushan : पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमीक भट्टाचार्य यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण देण्याची मागणी केली आहे. SIR आणि मतदार यादीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे जोरदार समर्थन केले आहे. ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला पाहिजे, अशी मागणी भट्टाचार्य यांनी केली आहे.

विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर सातत्याने टीका केली जात असताना भाजप नेत्याने हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

शमिक भट्टाचार्य म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालमध्ये अतिशय शांततेत आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पडल्या. राज्यातील सामान्य मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय मतदान करता आले, याचे श्रेय निवडणूक आयोगाला जाते.

पश्चिम बंगालसारख्या सीमावर्ती राज्यात मतदार यादीतून बांगलादेशी घुसखोरांची नावे हटवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी महत्त्वाची पावले उचलली, असा दावाही भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला. या कारवाईला राज्यातील जनतेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार याद्यांमधील कथित गडबड आणि नावे वगळण्याच्या प्रक्रियेवरून काँग्रेससह विरोधक निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शमिक भट्टाचार्य यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष स्वतःच राहुल गांधींच्या विधानांना गांभीर्याने घेत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras Wishes : आली दिवाळी! मराठी, हिंदी आणि इंग्रजीत धनतेरसचे प्रियजनांना पाठवा खास मेसेज

Dhanteras 2026 : धनतेरसला पैसे उधार दिले तर घरात येते गरिबी? काय सांगते धार्मिक मान्यता?

ZP अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; घरात सापडलं अडीच किलो सोनं, 11 किलो चांदी

दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; NDA मधील मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

SCROLL FOR NEXT