पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार.
23 आणि 29 एप्रिलला मतदान, तर 4 मे रोजी मतमोजणी.
जागा कमी झाल्या तरी तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्ता राखू शकते, असा अंदाज.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पश्चिम बंगालसह ४ राज्यांमधील विधनासभा निवडणुकींची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेस आपली सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. तर येथे सत्ता मिळवण्यासाठी भाजपनेही आपली कंबर कसली आहे.
आज निवडणूक जाहीर होताच ओपिनियन पोल समोर आले असून यात धक्कादायक अंदाज वर्तवला जात आहे. ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावली आहे. अशातच ओपिनियन पोलने अनेकांना धक्का दिलाय. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला धक्का बसताना दिसत आहे.
कारण तृणमूल काँग्रेसच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. जागा जरी कमी होण्याचा अंदाज असला तरी ममता बॅनर्जींच्या पक्षाला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता आहे. तर, असदुद्दीन ओवेसी यांच्या आघाडीला देखील चांगल्या जागा मिळतील, असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.
मॅटराईज आयएएनसच्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार पुन्हा येण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत जितक्या जागा जिंकल्या त्यातुलनेत यावेळी जागा कमी होऊ शकतात. ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 155-170 जागा मिळतील. तर भाजप 100-115 वर पोहचण्याची शक्यता आहे.
तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीतील अंतरही कमी राहण्याची शक्यता आहे. यासह असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम आघाडीची कामगिरी काँग्रेस पेक्षा चांगली राहण्याची शक्यता आहे. एमआयएमच्या आघाडीला ५ ते ६ जागा मिळू शकतात. काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पोलच्या अंदाजानुसार टीएमसीला 43-45 टक्के, भाजपला 41 ते 43 टक्के आणि इतरांना 13 ते 15 टक्के मतं मिळू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.