Odisha Car Accident Saam Tv
देश विदेश

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, भरधाव कार तलावात कोसळली; ५ जणांचा मृत्यू

Odisha Car Accident: ओडिशामध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. लग्नासाठी निघालेल्या तरुणांची कार तलावात कोसळली. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला.

Priya More
  • ओडिशातील ढेंकानाल येथे भयंकर अपघात

  • लग्नाला जाणारी कार तलावात कोसळून भीषण अपघात झाला

  • अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला

  • या अपघातामध्ये २ जणांचा जीव वाचला

ओडिशामध्ये भयंकर रस्ते अपघाताची घटना घडली. कार तलावामध्ये कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण लग्नासाठी जात होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. ओडिशाच्या ढेंकानाल जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेमुळे लग्न घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातामध्ये दोघे जण सुखरूप बचावले. या अपघाताचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाडींना घेऊन जाणारी भरधाव कार अनियंत्रित होऊन तलावात कोसळली. या घटनेमध्ये ५ जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बांगुरसिंह गावातील रहिवासी असलेल्या अभिषेक साहूचे लग्न होते. ढेंकानाल येथील इंदुपुर गावातील तरुमीसोबत त्याचे लग्न होते. या लग्नाला जाण्यासाठी बांगुरसिंह गावातील काही तरुण कारने जात होते. त्याचवेळी रस्त्यावर अंधार असल्याने कार अनियंत्रित झाली आणि थेट तलावात कोसळली. यावेळी कारमधील वऱ्हाडी आतममध्येच अडकले त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ५ जणांचा जीव गुदमरून जागीच मृत्यू झाला.

या अपघातामध्ये बांगूरसिंग गावातील २५ वर्षीय राम साहू, २६ वर्षीय अविनाश साहू, २५ वर्षीय राकेश कुमार साहू, २७ वर्षीय चंद्रकांत स्वाइन आणि नवरदेवाच्या मामाचा मुलगा अभिजीत साहू या पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर सर्वांनी एकच आक्रोश केला. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांनी कार पाण्यातून बाहेर काढली. घटनेची माहिती मिळताच ढेंकनाल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी ढेंकनाल जिल्हा मुख्यालय रुग्णालयात पाठवले.

प्रत्यक्षदर्शी दुर्वासा साहूने सांगितले की, कारमधील तरुण बांगूरसिंगहून इंदुपूरला जात होते. छटियाजवळ एक तलाव आहे. त्याचा अंदाज न आल्याने कार अनियंत्रित झाली आणि या तलावात पडली. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्ही पाहिले की कार पाण्यात बुडाली होती. आमच्यापैकी चार-पाच जण तलावात उतरले आणि कारमधील तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला यश आले नाही. त्यानंतर सर्व गावकरी घटनास्थळी आले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि कारमधील कुणीही जिवंत नव्हते. पाच जणांचा मृत्यू झाला. गाडीत सात जण होते. दोघे जण बाहेर पडण्यात यशस्वी झाले पण दरवाजा बंद असल्याने उरलेले पाच जण बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला.Accident

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

इबोलाचा उद्रेक; मृतांचा आकडा ३,००० च्या पार, WHO ने दिला मोठा इशारा

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT