Uttarakhand -Nepal Border Bus Accident Saam Tv
देश विदेश

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू

Uttarakhand -Nepal Border Bus Accident: उत्तराखंड- नेपाळ बॉर्डवर वऱ्हाडींच्या बसला अपघात झाला. बस दरीत कोसळली. अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू तर ३४ जण गंभीर जखमी झालेत.

Priya More

Summary -

  • लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडींची बस खोल दरीत कोसळली

  • या अपघातात १३ जणांचा मृत्यू तर ३४ जण गंभीर जखमी

  • मध्यरात्री हा अपघात झाला

  • जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक

उत्तराखंड- नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. तर ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस बैताडीहून बझांगला जात होती. नेपाळमधईल बैताडी येथे या बसला अपघात झाला. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

गुरूवारी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली. बैताडीच्या पुरचुनी नगरपालिकेतील सात भावने गावातून बझांगमधील सुनकुडा येथे ही बस चालली होती. नवरीला घेऊन बसने वऱ्हाडी निघाले होते. पण वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. पुरचुनीच्या बडगाव वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट १५० फूट खोल दरीत कोसळली.

हा अपघात झाला त्यावेळी बसमधील वऱ्हाडी झोपेत होते. बस कोसळताना जोरात आवाज झाल्यामुळे आसपासच्या गावांना अपघाताची माहिती कळाली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी आली. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य करत अनेकांचे प्राण वाचवले.

या अपघातामध्ये या अपघातात केशव राज जोशी (४० वर्षे), अशोक राज जोशी (१३ वर्षे), बसंत राज जोशी (३५ वर्षे), बिष्णू दत्त जोशी (४१ वर्षे), नरेश राज जोशी (४२ वर्षे), बिशन दत्त जोशी (१७ वर्षे), दीपक जोशी (२८ वर्षे), किशन जोशी (४६ वर्षे), मोहन देव भट्ट (६० वर्षे), बसंत राज रतला (४० वर्षे), पुष्पा अवस्थी (४० वर्षे) आणि सुशील जोशी यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आशा भोसले यांना येवल्यातील पैठणीची भुरळ

Gold Rate: सोनं-चांदीने उच्चांक गाठला, आठवडाभरात किती रुपयांनी वाढले, वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची यशाला गवसणी, पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक पदावर निवड

Who Is Zanai Bhosle: कोण आहे जनाई भोसले? आशा भोसले यांच्याशी आहे खास कनेक्शन

Stampede : चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ऐतिहासिक किल्ल्यावरील उत्सवात गदारोळ

SCROLL FOR NEXT