Wedding Cancelled Over Dog Fight Saam Tv
देश विदेश

Shocking News: कुत्र्यामुळे लग्न मोडलं! मंडपातच नवरा-नवरीचे नातेवाईक आपापसात भिडले; एकमेकांना धूधू धुतलं, ४ जण जखमी

Wedding Cancelled Over Dog Fight: लग्नामध्ये कुत्रा आल्यामुळे नवरा-नवरीच्या नातेवाईकांमध्ये तुफान राडा झाला. वऱ्हाडी मंडळींनी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत चार जण जखमी झाले.

Priya More

Summary -

  • कुत्रा लग्न मंडपात आल्याने मोठा वाद झाला

  • नवरा-नवरीच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी

  • महिलेसह ४ जण गंभीर जखमी झालेत

  • कुत्र्यामुळे लग्न मोडण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये कुत्र्यामुळे लग्न मोडल्याची आश्चर्यचकीत करणारी घटना घडली. लग्नसोहळ्यात कुत्रा आल्यामुळे नवरा-नवरीच्या नातेवाईकांमध्ये जोरदार राडा झाला. आधी शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांना धूधू धुतले. या घटनेमध्ये महिलेसह ४ जण जखमी झाले. या घटनेमुळे लग्न तर तुटले. याची चर्चा राज्यभर होत आहे. या घटनेप्रकरणी नवरा आणि नवरीच्या कुटुंबीयांनी एकमेकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला रात्री ही घटना घडली. लग्नाच्या हॉलमध्ये आनंदाचे वातावरण होते. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास लग्नाच्या विधींना सुरूवात झाली. त्याचवेळी नवरीच्या घरातील पाळीव कुत्रा लग्न मंडपात पोहचला. या कुत्र्याला बाजूला काढण्यावरून वाद सुरू झाला.

या वादातून नवरा-नवरीच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यांनी एकमेकांना धूधू धुतले. लग्नमंडपाला अक्षरश: कुस्तीच्या आखाड्याचे स्वरूप आले. या हाणामारीत एका महिलेसह ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लग्नमंडपात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही बाजूने लग्न मोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी एकमेकांकडून मिळालेल्या भेटवस्तू आणि दागिने परत केले. या प्रकरणी नवरा-नवरीच्या नातेवाईकांनी एकमेकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP: आधी पार्थ खासदार, आता जय पवारांकडे मोठी जबाबदारी; सुनेत्रा पवारांनी सूत्रे फिरवली

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Metro 9 And Metro 2B: मुंबईकरांची प्रतिक्षा कायम! मेट्रो ९ अन् 2B चे उद्घाटन लांबणीवर; कारण काय?

Cyber Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! मुंबईतील न्यायमूर्तींना एपीके फाईल पाठवून गंडवलं, नेमकं घडलं काय?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचे १२ वर्षानंतर धमाकेदार कमबॅक, पहिली झलक तुम्ही पाहिली का?

SCROLL FOR NEXT