कल्याणमध्ये कारचा कट लागल्याने दोन गटांमध्ये हाणामारी
झटापटीत दोघे गंभीर जखमी
पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली
अर्धा तास वाहतूक कोंडी आणि परिसरात तणाव
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याणमध्ये गाडीचा कट लागल्याने मोठा राडा झाला. या राड्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. झटापटीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिथिती नियंत्रणात आणली.तसेच जवळपास अर्धातास रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वाहनचालकांमध्ये कट लागल्यावरून सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी समर्थक जमा झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.
भर रस्त्यात झालेल्या झटापटीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आणि शंभर फूट रोडवरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. या झटापटीत दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनाही धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा रक्तदाब वाढल्याने त्यांना देखील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.पुढील तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.