Weather Update Saam Tv
देश विदेश

Weather Update: देशातील 'या' राज्यांमध्ये गारपीटीसह पावसाची शक्यता, महाराष्ट्रात काय स्थिती?

Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पर्वतांवर हलकी बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय पंजाबमध्येही तुरळक पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

Rohini Gudaghe

Weather Forecast 9 March IMD Alert

सध्या देशाच्या अनेक भागांमधील हवामान बदलत (Weather Forecast) आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पर्वतांवर हलकी बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ११ ते १३ मार्च या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात हलका पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. (latest weather update)

IMD च्या अंदाजानुसार १० ते १२ मार्च दरम्यान जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. याशिवाय पंजाबमध्येही तुरळक पावसाची शक्यता (Weather Forecast Today) आहे. IMD ने आपल्या अंदाजात म्हटलंय की, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये १२ ते १३ मार्च दरम्यान पाऊस पडेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिमालयीन राज्यांमध्ये तुरळक पाऊस किंवा हिमवृष्टी

९ आणि १० मार्च रोजी राजस्थान वगळता वायव्य भारतातील मैदानी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेलं (Weather Update) आहे. गुरुवारी किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. महाराष्ट्र राज्यात तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमानात वाढ झाल्यामुळं थंडी कमी होत आहे.

हवामान विभागाच्या मते १० आणि १२ मार्च रोजी जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी ( Snowfall) होऊ शकते. १३ आणि १४ मार्च रोजी हिमालयीन राज्यांमध्ये तुरळक पाऊस किंवा हिमवृष्टी होऊ शकते. IMD ने हिमाचल प्रदेशात ११ ते १३ मार्च दरम्यान विविध ठिकाणी विजेसह वादळाचा येलो अलर्ट (IMD Alert) जारी केला आहे. १२ आणि १३ मार्च रोजी पंजाबमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

बर्फवृष्टी पुन्हा वाढण्याचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत गिलगित बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. उत्तर ओडिशात तुरळक पावसाची शक्यता (Rainfall) आहे. पश्चिम बंगाल आणि दक्षिण केरळमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. १० मार्चपासून पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टी पुन्हा वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT