हिवाळा संपायला सुरुवात झाली असली तरी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाचा परिणाम अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. यातच उत्तर भारतातील मैदानी भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्ली, पंजाब, उत्तराखंडसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये काही दिवस पावसाची शक्यता आहे.
पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणा-चंडीगडमध्ये 19 आणि 20 तारखेला काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशाबद्दल बोलायचे झाल्यास, 20 आणि 22 फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पुढील चार दिवस मध्य प्रदेशातील विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या काळात जोरदार वारे वाहतील. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होऊ शकते. विशेषत: 20 फेब्रुवारीला हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री जम्मू आणि काश्मीरच्या बहुतेक उंच भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे आणि मैदानी भागात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्यामुळे सोमवारी सामान्य जनजीवन प्रभावित झाले. हिमवृष्टी आणि पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि श्रीनगर-लेह रस्ता बंद करण्यात आला आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गमध्ये 40 सेमी बर्फवृष्टी झाली आणि उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग रिसॉर्टमध्ये गेल्या 24 तासांत 41.9 मिमी पाऊस पडला, असे हवामान केंद्र श्रीनगरने सांगितले.
आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी जोधपूर, अजमेर, जयपूर आणि भरतपूर विभागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी भरतपूर विभागात एक किंवा दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. तसेच 21 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, फक्त भरतपूर विभागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.