Weather Update Today 1 February 2024 Saam TV
देश विदेश

IMD Rain Alert: कडाक्याच्या थंडीसोबत अवकाळी पावसाचा इशारा; कुठे अन् कधी कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट...

Weather Alert Today: सध्या ढगाळ वातावरण तयार झाले असून तापमानात किंचित वाढ झाली आहे. परिणामी उत्तर भारतातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा सरी कोसळत आहे.

Satish Daud

Weather Update Today 1 February 2024

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. मागील आठवडाभरापासून पडलेली कडाक्याची थंडी एका दिवसात गायब झाली आहे. यामागचे कारणही तसंच आहे. सध्या ढगाळ वातावरण तयार झाले असून तापमानात किंचित वाढ झाली आहे. परिणामी उत्तर भारतातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा सरी कोसळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या २४ तासांत राजधानी दिल्लीसह एनसीआर तसेच उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात अधून मधून पाऊस होत आहे. तर डोंगराळ भागात बर्फवृष्टी देखील झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार असून पावसाचा आणखीच जोर वाढणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

स्कायमेट हवामानानुसार, आज आणि उद्या पंजाब, हरियाणा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआरच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा (Heavy Rain Alert) अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्याचबरोबर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे, दक्षिण केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो.

हा पाऊस रबी हंगामातील पिकांना घातक असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही आयएमडीकडून देण्यात आला आहे. आयएमडीने म्हटले आहे की, पश्चिम हिमालयीन प्रदेशातील हवामानावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे १ फेब्रुवारीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात थंडीचा जोर कमी होईल. त्याचबरोबर तापमानात वाढ झाल्याने काही भागात ढगाळ वातावरण तयार होऊ शकते. काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT