Maharashtra Today Weather News Saam Tv
देश विदेश

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

IMD weather update for next 15 hours: देशातील २० राज्यांसाठी पुढचे १५ तास महत्वाचे असणार आहे. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Priya More
  • २० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

  • पुढील १५ तास हवामानासाठी अत्यंत महत्त्वाचे

  • ताशी ८० किमी वेगाने वारे वाहणार

  • वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

देशातील अनेक राज्यांमधील नागरिकांची लवकरच उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने २० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेळ ताशी ८० किलोमीटर इतका असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

भारतीय हवामान खात्याने, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यांसाठी पुढचे १५ तास महत्वाचे असणार आहेत. पुढील काही तासांत या ठिकाणी हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. २१ ते २२ जून दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२१ ते २६ जून दरम्यान दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. २१ जून रोजी जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमधील काही ठिकाणी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. २१ ते २६ जून दरम्यान छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये पावसाचा अंदाज आहे.

हा संपूर्ण आठवडाभर केरळ आणि माहे, लक्षद्वीपमध्ये २० ते २६ जूनदरम्यान, कर्नाटकमध्ये २१ ते २६ जूनदरम्यान आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा तसंच तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमामध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा, मथुरा, नोएडा, मेरठ, कानपूर, वाराणसी आणि प्रयागराज यांसह अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमधील पाटणा, गया, मुझफ्फरपूर आणि भागलपूर यांसह अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडेल. याठिकाणी ताशी ६५ किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील जोधपूर, जैसलमेर, अजमेर आणि अलवर यांसारख्या शहरांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून ताशी ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये डेहराडून, ऋषिकेश, हरिद्वार, नैनिताल आणि डोंगराळ भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

कावळ्यासारखा दिसणारा 'हा' पक्षी वर्षातून एकदाच फक्त पावसाचे पाणी पितो

Famous Actress : "मला बिकिनी घालून दाखव..."; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अश्लील मागणी

SCROLL FOR NEXT