IMD Unseasonal Rain Alert  Saam TV
देश विदेश

Rain Alert: सावधान! पुढील ६ दिवस कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी; हवामान खात्याकडून 'या' राज्यांना अलर्ट

Unseasonal Rain Alert: एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असताना दुसरीकडे हवामान खात्याने काही राज्यांमद्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Satish Daud

IMD Unseasonal Rain Alert

डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडगार वाऱ्यामुळे राजधानी दिल्लीसह एनसीआरमधील लोकांना कापरं भरवणारी थंडी जाणवत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही गारठा वाढला आहे. एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असताना दुसरीकडे हवामान खात्याने काही राज्यांमद्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तामिळनाडूसह 'या' राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Update) तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील ६ दिवस तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

ईशान्येकडील जोरदार वाऱ्यांमुळे आजपासून पुढील ६ दिवस म्हणजेच ३० डिसेंबर २०२३ पर्यंत तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात हलका ते मध्यम पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अरुणाचल प्रदेश, पंजाब, हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिल्लीतील तापमानात मोठी घट

राजधानी दिल्लीतील तापमानात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी जाणवत आहे. रविवारी दिल्लीचे किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. पुढील आठवडाभरात दिल्ली-एनसीआरमधील तापमानात मोठी घट होऊन दाट धुके पडतील, असं हवामान खात्याने सांगितलं.

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला.

ढगाळ वातावरण निवळल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी वाढली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्हे थंडीने गारठले आहेत. मुंबईसह पुण्यातील तापमानात देखील घट होत आहे. पुढील आठवड्यात मुंबईत गुलाबी थंडी पडू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT