Weather Alert : अनेक राज्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता, काही राज्यांतील तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  Saam tv
देश विदेश

Weather Alert : पावसाळ्यातही उन्हाचे चटके; पुढील ५ दिवस काही राज्यांत 'हाय गर्मी', अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट

IMD Alert : यंदा मान्सूनचं लवकर आगमन झालं असल्यानं अनेक राज्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर वायव्य भारतातील काही राज्यांत अद्याप उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील पाच दिवस उन्हाचे चटके बसणार आहेत. तर उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

Nandkumar Joshi

यंदा मान्सून भारतात लवकरच धडकला आहे. त्यामुळं अनेक राज्यांमधील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वदूर सरी बरसत आहेत. आज, गुरुवारी उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वायव्य भारतातील काही भागांत पुढील पाच दिवस उष्णता वाढणार आहे. या दरम्यान तापमान चार ते सहा अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पूर्वेकडील राज्यांमध्ये आज, गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर काही वेळाने पावसाची तीव्रता कमी होईल. तर मध्य भारतातील काही भागांमध्ये दोन ते चार अंश सेल्सियसने तापमानात वाढ होईल. पूर्वेकडील राज्यांमध्ये बहुतांश भागांत पुढील सात दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराममध्ये ५ जून रोजी वेगवेगळ्या भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालयात पाच आणि सहा जून तसेच ९ ते ११ जून या कालावधीत पाच वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पूर्व आणि मध्य भारतातही काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी हलक्या सरी ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. मध्य प्रदेशात पाच ते सात जून, विदर्भ, छत्तीसगडमध्ये पाच ते नऊ जून, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडमध्ये पाच जून रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. बिहारमध्ये आज, वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थानसह या राज्यांमध्ये पाऊस

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पाच जून रोजी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

वायव्य भारतातील काही भागांत तापमानात चार ते सहा अंश सेल्सियसपर्यंत वाढ होणार आहे. मध्य भारतात पुढील तीन दिवस कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT