Class 10 Girl Ranked 1st Died Due To Jaundice saam tv
देश विदेश

WBBSE Exam Result: दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली आली... पण त्याआधीच कावीळनं घेतला बळी

Class 10 Girl Ranked 1st Died Due To Jaundice: मुख्याध्यापिका पापरी मुखर्जी यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं की, १६ वर्षीय विद्यार्थिंनी आजारी असताना परीक्षेला येत होती, तिने सर्व पेपर दिले.

Bharat Jadhav

'गड आला पण सिंह गेला', ही म्हण आपण ऐकली असेल, अशीच घटना पश्चिम बंगालमधील एका दहावीच्या विद्यार्थिनीसोबत घडलीय. अंगात फणफणारा ताप असतानाही दहावीच्या विद्यार्थिनीनं परीक्षेचे सर्व पेपर दिलेत. तिच्या मेहनतीचं फळही मिळालं. तिने दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणासह उत्तीर्ण होत शाळेत पहिल्या क्रमांक मिळवला, पण नशिबानं तिचा घात केला. दहावीचा निकाल लागण्याआधीच या जिद्दी मुलीचा मृत्यू झाला.

या विद्यार्थिनीचं नाव थोईबी मुखर्जी आहे, शाळेत पहिल्या क्रमांकाने पास झाल्यानंतर सर्व आनंद झाला. पण थोईबी मुखर्जी या जगात नसल्याच्या जाणीवनं घरातील प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू आले. मिळालेल्या माहितीनुसार, तिला कावीळची लागण झाली असल्याची कल्पना थोईबीला होती. अंगात ताप असतानाही ती परीक्षेला हजर राहिली. तपासणीनंतरच तिला कावीळची लागण झाल्यांच निदान झालं होतं. परीक्षे होईपर्यंत तिचं यकृत पूर्णपणे खराब झाले होतं. तिला उपचारासाठी हैदराबादला नेण्यात आलं, परंतु १६ एप्रिल रोजी ती जीवनाची लढाई हरली.

बंगाल बोर्ड परीक्षेचा निकाल काल लागला त्यावेळी थोईबीच्या शाळेतील विद्यार्थी भावूक झाले होते. थोईबी मुखर्जी उमा राणी गोराई महिला कल्याण शाळेची विद्यार्थिनी होती. निकालाच्या दिवशी तेथील काही विद्यार्थ्यांचे डोळे थोईबीच्या आठवणीने पाणावले होते. मुख्याध्यापिका पापरी मुखर्जी यांनी पत्रकारांना सांगितले की, परीक्षेदरम्यान थोईबी ही खूप आजारी होती. तिच्याविषयी परीक्षा केंद्रातील शिक्षकांमध्ये चिंता व्यक्त केली होती. कारण पेपर लिहितांना तिला खूप त्रास होत असायचा.

अधूनमधून तिला लिहिता येत नव्हतं. पेपर सोडवताना ती डोक्यावर हात ठेवत असायची अशी माहिती ," श्रीमती मुखर्जी यांनी दिली. "तिला ६७४ गुण मिळालेत, पण त्याचा काही उपयोग नाही. पण कदाचित ताप असताना तिने पेपर दिले नसते तर बरे झाले असते. यावर्षी तिने परीक्षा दिली नसती, ती अनुत्तीर्ण राहिली असती, पण आमच्यात असती," असंही मुख्याध्यापिका म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT