Rahul Gandhi Saam TV
देश विदेश

राहुल गांधीच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी पोलिसांकडून काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक

जून महिन्यामध्ये राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या कार्यालयातील काही पोस्टर्स देखील फाडण्यात आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वायनाड: केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्याच चार कार्यकर्त्यांना अटक केल्याची घटना घडली आहे. या चार कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधीचा पीए देखील असल्याचं सांगितलं जात आहे.

जून महिन्यामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या कार्यालयातील काही पोस्टर्स देखील फाडण्यात आली होती. या तोडफोडी प्रकरणी 'एसएफआई'च्या कार्यकर्त्यांवरती आरोप करण्यात आला होता. मात्र, आता पोलिसांनी या प्रकरणात काँग्रेसच्याच (Congress) ४ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

पाहा व्हिडीओ -

२४ जून रोजी खासदार राहुल गांधी यांच्या वायनाडमधील कार्यालयामध्ये तोडफोड झाली होती. सीपीएम च्या विद्यार्थी संघटनेने गांधी यांच्या कार्यालयाला घेराव घातल्याचं सांगण्यात आलं होतं. काही महिन्यांपुर्वी सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाबाबत एक मोठा निर्णय दिला होता.

त्या निर्णयामध्ये संरक्षित वने, वन्यजीव अभयारण्याजवळच्या एक किलोमीटरचा परिसर हा पर्यावरणासाठीच संवेदनशिल क्षेत्र करण्यात येणार होता. त्यामुळे या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

पोलिसांनी अटक केली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना -

काँग्रेसने एसएफआई च्या कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप केला होता. मात्र, काँग्रेसने केलेले आरोप पोलिसांनी फेटाळत, ही तोडफोड एसएफआई च्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीचं केला असल्याचं म्हटलं आहे. याच प्रकरणी आता पोलिसांनी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली असून यामध्ये राहुल यांच्या पीए चा देखील समावेश आहे.

तोडफोडीचा Video व्हायरल -

राहुल यांच्या कार्यालयाची तोडफोड झालेला व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही आंदोलक गांधी यांच्या कार्यालयामध्ये आत जायचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांच्या कामाची बातमी! ६० लाखांच्या होम लोनवर वाचवता येणार १९ लाख; ही ट्रिक वापरा

Face Care: रात्री मेकअप रिमूव्ह न करता झोपल्यास काय होते?

GK: तुम्हाला माहितेय का? 'हा' एक देश एका दिवससाठी भारताची राजधानी बनले

Betrayal Indian history: एकाच्या दगाबाजीने बदलला देशाचा इतिहास; कोण होता तो गद्दार राजा?

SCROLL FOR NEXT