Wayanad landslides Saam tv
देश विदेश

Wayanad landslides : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले, १० जणांचा मृत्यू

Kerala Wayanad landslides News : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झाल्या घटना घडली आहे. या भूस्खलनात १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत काहींचा मृत्यू झाला आहे.

Pramod Subhash Jagtap

वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसादरम्यान भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या भूस्खलनात १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत २ लहान मुलांसहित १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे ४.१० वाजता दुसऱ्यांदा भूस्खलनाची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात १०० हून अधिक लोक अडकले. तर भूस्खलनात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेनंतर १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या १६ जणांना वायनाडमधील मेप्पाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचं या दुर्घटनेवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वायनाडमधील भूस्खलनानंतर सुरु केलेल्या मदतकार्यात साधण्यात येईल, असे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा मदतीसाठी धावल्या आहेत. केरळ सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर अनेक राज्यमंत्री या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

वायनाडच्या ४ गावात भूस्खलन

केरळच्या वायनाडमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ४ गावात भूस्खलन झालं आहे. मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांना भूस्खलनाचा तडाखा बसला आहे. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. चार गावात मिळून ४०० पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून मदतीचं काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, समर्थकांचा मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमाव|VIDEO

सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन दुसऱ्यांना झाली आई; शुटिंगला जाताना आल्या प्रसृती कळा

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

Maharashtra Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावर दोन बाईक अपघातात कल्याण डोंबिवली येथील नवरा बायकोचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT