Water Crisis Saam Digital
देश विदेश

Delhi Water Supply: खबरदार! पाण्याचा अपव्यय कराल तर... भरावा लागेल 2000 रुपयांचा दंड, 200 पथकांची असणार करडी नजर

Delhi Water Supply News: दिल्लीत ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपवय होत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने यावर लक्ष ठेवण्यासाठी २०० पथकं तयार करण्यातआली असून २००० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

Sandeep Gawade

कडाक्याच्या उन्हात देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपवय सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी 200 पथकं तयार करण्यात आली असून पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर पथकांचं सकाळपासून लक्ष राहणार आहे. पाण्याची नासाडी करताना कोणी सापडलं तर त्याला 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ३० जूनपासून मुंबईतही पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई महानगरपालिका पाण्याचा अपवय टाळण्यासाठी पावलं उचलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री अतिशी यांनी जल मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. पाणी वाया घालवताना कोणी सापडलं तर त्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 200 पथके तैनात करण्याच्या सूचना अतिशी यांनी दिल्या आहेत. जे लोक पाईपने गाड्या धुतात, पाण्याच्या टाक्या अव्हरफ्लो झाल्यानंतरही लक्ष देत नाहीत. बांधकाम किंवा व्यावसायिक गरजांसाठी घरगुती पाणीप वापरतात त्यांच्यावर ही टीम नजर ठेवणार आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून ही पथके सर्वत्र तैनात करण्यात येणार आहेत. या पथकांना बांधकाम किंवा व्यावसायिक ठिकाणी कोणतेही अवैध पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ही कडक पावले उचलण्यात आली आहेत. आजकाल लोक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाण्याचा अधिक वापर करतात. अशा स्थितीत पाण्याचा अपव्यय अधिक होतो. दिल्लीत असे अनेक भाग आहेत जिथे टाक्यांच्या मदतीने पाणीपुरवठा केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT