उत्तर प्रदेशमधील डुंगरपूर वसाहतीत प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी आझम खान यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. रामपूर आमदार खासदार न्यायालयात आरोप सिद्ध झाले असून शिक्षेचा निर्णय राखून ठेवला आहे. गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डुंगरपूर वसाहत हटवण्यावरून 2019 मध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात आझम खान यांच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात बरकत अली आणि आझम खान हे कंत्राटदार आरोपी होते. त्यांच्याविरुद्ध कलम 392, 504, 506, 452, 120B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज आझम खान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. हा संपूर्ण खटला 2019 मध्ये नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादी अबरार यांनी आपल्या घराची तोडफोड, मारहाण, घर जबरदस्तीने रिकामे करून बुलडोझरच्या सहाय्याने घर पाडण्यात आल्याचा आरोप केला आहे, असं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं.
चार दिवसांपूर्वीच अलाहाबाद उच्च न्यायालयाने बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलाला जामीन मंजूर केला होता. खान कुटुंबीयांसाठी हा दिलासा मानला जात होता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयानेही बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात आझम खान यांना सुनावलेल्या सात वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली.
आझम खान यांची पत्नी तनजीन फातिमा या आजच तुरुंगातून बाहेर येऊ शकतात, मात्र आझम खान सध्या तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत कारण ते इतर काही प्रकरणांमध्येही दोषी आहेत. खान, त्यांची पत्नी आणि मुलाला रामपूर कोर्टाने फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे.२०२९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे रामपूरचे आमदार आकाश सक्सेना यांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये खान आणि त्यांच्या पत्नीवर त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खानसाठी दोन जन्म प्रमाणपत्रे मिळविल्याचा आरोप आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.