Bridge collapsed in Chandauli Saraiya village/ANI/Twitter saam tv
देश विदेश

VIDEO : गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेनंतर यूपीत मोठा अपघात; छटपूजेवेळी पूल कोसळला

गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेनंतर आता उत्तर प्रदेशात छटपूजेवेळी पूल कोसळला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Nandkumar Joshi

Uttar Pradesh News : गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेनंतर आता उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात सोमवारी मोठी घटना घडली आहे. छटपूजेवेळी कर्मनाशा नदीवरील पूल अचानक कोसळला. या पुलावर उभे असलेले १२ हून अधिक नदीच्या पाण्यात पडले.

पूल कोसळल्यानंतर (Bridge Collapsed) नदीत पडणाऱ्या भाविकांना बघून आजूबाजूला असलेल्या लोकांनी आरडाओरड सुरू केली. सुदैवाने नदीपात्रात पाणी कमी असल्याने कुणी बुडालं नाही. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी नदीत पडलेल्या भाविकांना तात्काळ बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. (Letest Marathi News)

चंदौली जिल्ह्यातील चकिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरैया गावाजवळ ही घटना घडली. चार दिवस चालणाऱ्या छटपूजा महापर्वाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सरैया गावाजवळून वाहणाऱ्या कर्मनाशा नदीजवळ महिला मोठ्या संख्येने जमल्या होत्या. महिला नदीजवळ पूजा-अर्चा करत होत्या. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे कुटुंबीय नदीच्या पुलावर उभे राहिले होते. (Breaking Marathi News)

छटपूजा सुरू असतानाच नदीवरील पूल कोसळला. पुलावर उभे असलेले १२ हून अधिक लोक नदीत कोसळले. पूल कोसळताना पाहून जवळच असलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरडा सुरू केला. नदीपात्रात पाणी कमी असल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. काही ग्रामस्थांनी नदीत पडलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढले. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी घेतली धाव

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती घेऊन पोलीस परतले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, छटपूजेवेळी ही दुर्घटना घडली. पुलावर काही लोक उभे होते. त्यावेळी अचानक पूल कोसळला. कुणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकर्त्याला साथ का दिली? जाब विचारत अजित पवारांचा नेता घरात घुसला, दगड- कोयत्याने कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Highest Grossing Movies : 2025मध्ये 'छावा' चा बोलबाला, सर्वाधिक कमाई करणारे 5 चित्रपट कोणते?

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, एकाचा मृत्यू

Smartphone Effects: स्मार्टफोनचा झोपेवर दुष्परिणाम! झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने घटते झोपेचे हार्मोन?

Migraine Solution : मायग्रेनने त्रस्त आहात? या जपानी ट्रिकने मिळेल आराम

SCROLL FOR NEXT