Sleep Job Offer Saam Tv
देश विदेश

Sleep Job Offer: '9 तास झोपा अन् 10 लाख कमवा'; प्रसिद्ध कंपनीची भन्नाट ऑफर

Sleep Job Offer: वेकफिट कंपनीने झोप इंटर्नशिप सुरू केली आहे. 9 तास गाढ झोपल्यावर 10 लाख रुपये मिळणार आहेत. या ऑफरमुळे झोपेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.

Manasvi Choudhary

'फक्त तासनतास झोपा आणि पैसे कमवा' असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही ऑफर नक्की स्विकाराल. अनेकांनी याचे स्वप्न देखील पाहिली असतील. मात्र, खरचं कधी झोपण्याचे पैसे मिळतील का ओ? तर याचे उत्तर आता हो आहे. देशातील सुप्रसिद्ध कंपनीने ही ऑफर दिली आहे. 9 तास गाढ झोपण्यासाठी तुम्हाला 10 लाख रूपये दिले जाणार आहेत. काय आहे ही ऑफर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

देशातील सुप्रसिद्ध फर्निचर आणि गाद्या उत्पादक कंपनीने ही भन्नाट इंटर्नशिप सुरू केली आहे. वेकफिट कंपनीची ही इंटर्नशिप आहे. इंटर्नशिपचा 5 वा सीझन सुरू आहे. या ऑफरचा मूळ उद्देश झोपेचे महत्व समजावून सांगणे असा आहे. या इंटर्नशिपसाठी निवडून आलेल्यांना 9 तास कंपनीच्या गादीवर झोपावे लागणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला केवळ झोपण्याचे लाखो रूपये मिळणार आहे.

या कंपनीत भाग घेण्यासाठी काही नियम आहेत.

1) दररोज रात्री वेळेवर येऊन झोपणे हे काम करावे लागणार आहे.

2) कंपनीकडून तुम्हाला वेकफिटची गादी आणि एक उत्तम स्लीप ट्रॅकर देण्यात येणार आहे.

3) कंपनीकडून स्पर्धकाच्या झोपेचे निरक्षण करण्यात येईल.

4) झोपल्यानंतर गादीवरचा तुमचा अनुभव तुम्हाला कंपनीसोबत शेअर करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ती एक चूक अन् लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; केवायसी करुनही पैसे नाही; कारण काय?

Nagpur : प्रेमातील नकार पचवता आला नाही, तरूणीची घरात घुसून हत्या, गळा दाबला अन् डोके भींतीवर आदळले

Ganesh Jayanti auspicious rituals: आज गणेश चतुर्थी; गौरी-गणेश जयंतीनिमित्त पंचांगात काय विशेष?

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

Sleepy after eating rice: भात खाल्ल्यानंतर प्रचंड झोप येते?

SCROLL FOR NEXT