Ganpati Bappa 2025: उजवी की डावी? शास्त्रानुसार कोणत्या सोंडेचा गणपती बाप्पा घरी बसवणं असतं शुभ?

Ganpati Trunk Meaning: गणपतीची सोंड उजवी की डावी, यावर त्याचे महत्व ठरते. डाव्या सोंडेचा गणपती (वाममुखी) घरात शुभ मानला जातो, तर उजव्या सोंडेचा गणपती विशेष नियमांसह पूजला जातो.
Ganpati Bappa 2025
Ganpati Bappa 2025Saam Tv
Published On

२७ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन होणार आहे. हिंदू धर्मानुसार, गणपती बाप्पा आराध्य दैवत मानले जातात. याच गणरायाचे दर्शन घेताना तुम्ही काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. गणपतीची सोंड ही उजवी आणि काहींमध्ये डावीकडे असते. प्रत्येक गणपतीचे विशेष महत्व असते. यानुसार आज आपण उजव्या आणि डाव्या सोंडेच्या गणपतीचे महत्व जाणून घेऊया.

Ganpati Bappa 2025
Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी करा हे 6 सोपे उपाय; आयुष्यातील प्रत्येक अडचणी होतील दूर

गणपती बाप्पाच्या स्वरूपांविषयी अनेक रहस्य सांगितले जातात. गणपतीची अनेक रूपे आहेत. गणपतीच्या सोंडेची दिशा महत्वाची असते. गणपतीची सोंड एका बाजूला वळलेली असते त्याला वक्रतुंड म्हणतात. शास्त्रानुसार, डाव्या सोंडेचा गणपती घरात आणि ऑफिसमध्ये स्थापित करणे अधिक शुभ मानले जाते.

Ganpati Bappa 2025
Ganesh Chaturthi 2025: तुमच्याही घरी गणपती बसणार आहे? बाप्पाची मूर्ती आणताना 'या' 7 नियमांचं पालन अवश्य करा

उजव्या सोंडेचा गणपती

गणपती बाप्पाची सोंड उजव्या दिशेला असते. उजव्या सोंडेचा गणपती याचा अर्थ दक्षिणाभिमुख मूर्ती असं मानलं जाते. दक्षिण याचा अर्थ असा की उजवी बाजू किंवा दक्षिण दिशा. ही दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची असते. यमलोकाच्या दिशेला तोंड देण्याची ताकद या गणपतीमध्ये असते. त्याची सूर्यनाडी असल्याने तेजस्वीही असतो. दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप- पुण्याचा लेखाजोखा केला जातो असं मानलं जातं त्यामुळे ही बाजू नकोशी असते असे सांगतात. उजव्या सोंडेचा गणपतीचे नियम देखील कडक असतात. या गणपतीची पूजा करताना मार्गदर्शन घेणे महत्वाचे असते.

डाव्या सोंडेचा गणपती

डाव्या सोंडेचा गणपती वाममुखी गणपती असेही म्हटले जाते. वाम यचा अर्थ डावी किंवा उत्तर बाजू. डावी बाजू ही उजव्या बाजूच्या विरूद्ध दिशेस असते. डाव्या बाजूला चंद्रनाडी असते ती शीतलता देते. उत्तर बाजू ही अध्यात्माला पूरक असते असे मानले जाते. त्यामुळेच वाममुखी गणपती पूजेसाठी शुभ मानला जातो. डाव्या गणपतीची पूजा नियमितपणे केली जाते.

Ganpati Bappa 2025
Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' रंगाचे कपडे परिधान करा; बाप्पांच्या स्वागतासाठी मानले जातात शुभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com