Vodafone Idea Recharge Plans, Tech News Updates Saam Tv
देश विदेश

Vodafone Idea चा जबरदस्त प्लान; 151 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार बरचं काही

Vi ने 151 रुपयांचा नवीन प्लान बाजारात आणला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया (Vi) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने नवनवीन प्लान्स आणि ऑफर आणत आहे. इतर प्रतिस्पर्धी कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या तुलनेत Vi थोडी मागे पडली असली तरीही कंपनीकडे कमी किंमतीत येणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक नवीन आणि स्वस्त प्लान बाजारात आणला आहे. (Vodafone Idea Latest Mobile Recharge Plans)

Vi च्या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, Vi ने 151 रुपयांचा नवीन प्लान बाजारात आणला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना Disney Plus Hotstar बेनिफिट 3 महिन्यांसाठी मोफत दिला जाईल. याशिवाय एका महिन्यासाठी 8 जीबी डेटा सुद्धा मिळेल. हा एक डेटा बूस्टर पॅक आहे जो वापरकर्त्याकडे प्रथम अमर्यादित पॅक सदस्यता असेल तेव्हा वापरला जातो. म्हणजेच त्याची सेवा वैधता नाही.

टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने बाजारात आणलेला 151 रुपयांचा प्लान हा ग्राहकांसाठी खूपच खास आहे. या प्लानअंतर्गत 151 रुपयांचे रिचार्ज केल्यास यूजर्सना Disney Plus Hotstar बेनिफिट 3 महिन्यांसाठी मोफत दिला जाईल. एवढंच नाही तर, युजर्सना यासोबत 8 जीबी इंटरनेट डेटा देखील मिळेल. या डेटा पॅकची वैधता 30 दिवसांची आहे.

याशिवाय Vodafone Idea ने 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा 118 रुपयांचा प्लॅन देखील बाजारात आणला आहे. हा देखील एक डेटा आधारित प्लॅन आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी 12GB डेटा दिला जातो. यामध्ये ग्राहकांना, Vi Movies आणि TV व्यतिरिक्त, कोणत्याही प्रकारे अतिरिक्त लाभ दिला जात नाही.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT