नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत आहे. बुधवारी सकाळी सुद्धा जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. मात्र, वाढ होऊनही देशांतर्गत बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्या-चांदीचे दर खाली आले आहेत. सोन्याच्या वायदा किमतीत थोडीशी घसरण झाली असली तरी चांदीचा भाव 60 हजारांच्या खाली आला आहे. (Gold Silver Latest Price Today)
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सकाळी 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 2 रुपयांनी घसरून 50,820 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. याआधी सोन्याचा व्यवहार 50,779 रुपयांपासून सुरू झाला होता, पण देशांतर्गत बाजारात मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण झाली आहे. सोने सध्या त्याच्या मागील बंद किमतीच्या जवळपास समान पातळीवर व्यवहार करत आहे.
चांदीच्या दरात मोठी घसरण
आज चांदीच्या मागणीत घट झाली होती, त्यामुळे त्याची वायदा किंमतही 60 हजारांच्या खाली आली आहे. एमसीएक्सवर चांदीचा भाव 213 रुपयांनी घसरून 59,326 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 59,280 रुपयांवर सुरू झाला होता. चांदीची सध्याची फ्युचर्स किंमत मागील बंदच्या तुलनेत 0.36 टक्क्यांनी खाली आहे. (Gold-Silver Price Hike Today)
जागतिक बाजारात सोनं तेजीत
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या पुरवठ्यावर सतत परिणाम होत आहे. यामुळेच येथे काही काळापासून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आजच्या व्यवहारातही, सोन्याची स्पॉट किंमत $1,821.88 प्रति औंसवर पोहोचली, जी त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.19 टक्के अधिक आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत $ 20.85 प्रति औंस आहे, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.11 टक्क्यांनी वाढली आहे.
रशियाच्या सोन्याच्या आयातीवर 7 देशांनी निर्बंध लादल्यानंतर जागतिक बाजारपेठेत त्याच्या पुरवठ्यावर काही काळ परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. रशिया हा सोन्याचा प्रमुख निर्यातदार असून तिथून होणारी आवक बंद झाल्याने भारतासह जगभरातील बाजारपेठांवर परिणाम होणार आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीचे भाव पुढील काही काळ तेजीत राहू शकतात.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.