मुंबई: रोजच्या धावपळीच्या जीवनात वेदना, थकवा, ताण अश्या गंभीर समस्या जाणवतात. यांपासून त्वरित मुक्तता मिळवण्यासाठी अनेकदा पेन किलरचा (Pain Killer) वापर करतात, पण तुम्हाला माहीत आहे का? की ही उपचारपद्धती किती घातक ठरू शकते. अशा औषधांना वैद्यकीय भाषेत वेदनाशामक (Analgesic) म्हणतात, जाणून घेऊया त्यामुळे होणारे नुकसान-
पेन किलर आहे हृदयासाठी धोकादायक!
डायक्लोफेनाक या औषधाचा वापर केल्यास हृदयविकाराचा झटका (Heart Attack) सारख्या मोठ्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढू शकतो. याबाबत यासंदर्भात झालेल्या अभ्यासातही इशारा देण्यात आला होता. BMJ मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात डायक्लोफेनाकच्या वापराची तुलना इतर औषध, पॅरासिटामॉल आणि इतर औषधांसोबत करण्यात आली आहे.
"पेन किलरच्या पाकिटावर सर्व लिहिलेलं असावं"
डेन्मार्कमधील आरहूस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संशोधकांनी सांगितले आहे की, मुळात डायक्लोफेनाक सामान्य विक्रीसाठी उपलब्ध नसावे आणि ते जरी विकले गेल्यास, त्याच्या पॅकेटच्या पुढील संभाव्य धोक्याचे तपशीलवार माहिती दिली पाहिजे.
डिक्लोफेनाक औषध म्हणजे काय?
डिक्लोफेनाक (Diclofenac) हे पारंपारिक नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी (Nonsteroidal Anti-Inflammatory Drug) औषध आहे, जे वेदना आणि जळजळ यांच्या उपचारांसाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.