लाईव्हदरम्यान अँकरचा दात हातात आला saam tv
देश विदेश

Viral Video | लाईव्हदरम्यान अँकरचा दात हातात आला आणि.., पाहा व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला अँकर लाईव्ह न्यूज वाचताना दिसत आहे. यादरम्यान, तिच्यासोबत एक विचित्र घटना घडते. मात्र, त्यानंतरही महिला अँकर बातम्या वाचणे थांबवत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टीव्हीवर अँकरिंग करणे हे अत्यंत कठीण काम आहे. हे करत असताना अँकरला (News Anchoring) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कोणी त्यांच्या मधे येऊन जातं, कधी कुठले पाहुणे भांडायला लागतात, तर कधी आणखी काही होतं. मात्र परिस्थिती कशीही असू देत अँकर (News Anchor) त्यांचं काम चोख पद्धतीने पार पाडतात. अशाच एका अँकरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) शेअर होतो आहे. यामध्ये त्या अँकरला अत्यंत विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले, तरीही तिने तिचे काम सुरुच ठेवलं.

लाईव्हदरम्यान जेव्हा अँकरचा दात पडला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला अँकर लाईव्ह न्यूज (Live News) वाचताना दिसत आहे. यादरम्यान, तिच्यासोबत एक विचित्र घटना घडते. मात्र, त्यानंतरही महिला अँकर बातम्या वाचणे थांबवत नाही आणि आपले काम चोखपणे पार पाडण्यात यशस्वी ठरते. हा व्हिडीओ युक्रेनच्या (Ukraine) न्यूज अँकरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

युक्रेनची न्यूज अँकर मार्सिहका पडालको लाईव्ह बातम्या वाचत होती. ती बातमी वाचत असताना तिचा दात अचानक तुटला. पण, अचानक घडलेल्या या घटनेही तिचे लक्ष विचलित झाले नाही आणि तिने आपल्या कामात अडथळा येऊ दिला नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला अँकर बातमी वाचताना तिच्या हातातील तुटलेला दात काढून घेते आणि त्यानंतरही न थांबता आपली जबाबदारी पार पाडते. यादरम्यान, ती बुलेटिन पूर्ण करते तेही एक क्षणासाठी विचलित न होता.

पाहा हा व्हिडीओ -

म्हणून बनावटी दात लावला...

युक्रेनची न्यूज अँकर Marichka ने स्वतः या घटनेचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहीले की, 'बातमी पाहणारे प्रेक्षक या घटनेकडे लक्ष देतील, याची मला अपेक्षा नव्हती'. तिने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, 'एका दशकापूर्वी तिच्या मुलीने चुकून तिच्या दातावर लोखंडी घड्याळ मारले होते. त्यामुळे तिचा दात तुटला होता. त्यानंतर तिला बनावटी दात लावाला लागला होता'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT