Ghaziabad Viral Video SAAM TV
देश विदेश

Viral Video: मेहंदी समारंभात डीजे वाजवण्यावरून दोन गटात तूफान राडा, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Ghaziabad Viral Video: या राड्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले. व्हिडिओत महिलांच्या किंचाळण्याचा आवाज देखील ऐकू येत आहे.

Chandrakant Jagtap

Ghaziabad News: गाझियाबादच्या मसुरी पोलीस ठाण्यात हद्दीतील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान दोन गटात तूफान राडा झाल्याची घटना घडली आहे. हॉटेलमध्ये कार्यक्रमासाठी आलेले पाहूणे आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधीत हॉटेलमध्ये मेहंदी समारंभ सुरू होता. या दरम्यान डीजे वाजवण्यावरून हॉटेलचे कर्मचारी आणि पाहुणे यांच्यात वाद झाला आणि नंतर हॉटेल कर्मचारी आणि समारंभासाठी आलेले पाहुणे एकमेकांना भिडले. यावेळी लाठ्या काठ्यांचा वापर करत तूफान हाणामारी झाली.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही गटांमधील लोक एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तर काही लोकांनी बेल्ट आणि काठ्यांनी देखील मारहाण केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

या घटनेनंतर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने कायदा आणि सुव्यवस्थेचे अंत्यसंस्कार केले आहेत असे ट्वीट त्यानी केले आहेत. यासोबत त्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. (Viral Video)

या राड्यात कार्यक्रमासाठी आलेल्या महिला आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले. या व्हिडिओत महिलांच्या किंचाळण्याचा आवाज देखील ऐकू येत आहे. गाझियाबादच्या मसुरी पोलीस ठाण्याच्या आयआरएस बँक्वेट हॉलमध्ये ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलीस आता कारवाई करत आहेत. (Latest Marathi News)

गाझियाबाद पोलिस आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मसुरीच्या ग्रॅंड आयरिस हॉटेलमध्ये रात्री उशीरा 2 वाजेपर्यंत कॉकटेल पार्टी सुरू होती. लग्नासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतील पाहुण्यांनी उशीरापर्यंत डीचे वाजवण्याची मागणी केली. त्याला हॉटेल कर्मचाऱ्यांनी विरोध केला. त्यानतंर वाद वाढत गेला.

याप्रकरणी पाहुण्यांनी हॉटेल मालकासह त्यांच्या 15 ते 20 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पाहुण्यांनी केला आहे. या प्रकरणात 9 लोकांना ताब्यात घेतले असून उर्वरितांची ओळख पटवून त्यांना देखील ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! Samsung चा प्रिमियम S24 सीरीज फोन २१,००० रुपयांनी स्वस्त, लगेच खरेदी करा

Maharashtra News Live Update: शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद

IPL: गुवाहाटीत होणार RR अन् मुंबई इंडियन्सचा हाय-व्होल्टेज सामना, कोणाचं पारडं आहे जड? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड

Bugadi Earrings Designs: लग्नात नवरीसाठी बुगडीचे 5 नवीन प्रकार, सौंदर्य दिसेल भारी

Navi Mumbai: नवी मुंबईत गोळीबाराचा थरार, सामाजिक कार्यकर्त्यांवर धाड धाड गोळ्या झाडल्या

SCROLL FOR NEXT