बाईकवर ट्रिपल सीट, अश्लील चाळे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ४ हजार रूपयांचा दंड Google
देश विदेश

Triple Riding & Kissing : बाईकवर ट्रिपल सीट, अश्लील चाळे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ४ हजार रूपयांचा दंड

Viral Video: दोन तरुण आणि एका तरुणीचा दुचाकीनरून तिहेरी प्रवास करताना अनुचित वर्तन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दुचाकी मालकाला दंड ठोठावला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल सोशल मीडियावर प्रेमीयुगुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा बाईकवरुन जाताना ते अश्लील चाळे करताना दिसतात. यामुळे मात्र, रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर लोकांना त्रास होतो. असाच एक बंगळुरुतील व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओत दोन तरुण आणि एक तरुणी बाईकवरुन प्रवास करत आहे. त्यात मागचे तरुण अन् तरुणी भररस्त्यात अश्लील चाळे करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओत हे तिघेही बाईकवरुन जाताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे तिघांनी बाईकवरुन प्रवास करणे हा गुन्हा आहे. त्यातही मागे बसलेले दोघे जण अश्लील चाळे करत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

हा व्हिडिओ व्हायरल होताच बंगळुरु पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन तरुण आणि एका तरुणीचा दुचाकीनरून तिहेरी प्रवास करताना अनुचित वर्तन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी दुचाकी मालकाचा माग काढत त्याला ४,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ही घटना ७ फेब्रुवारी रोजी रागीगुड्डा मेट्रो स्टेशनजवळ घडली. ते तिघे रागीगुड्डा बस स्टँडवरून मेट्रो स्टेशनकडे दुचाकीवरून जात होते. एक तरून बाईक चालवत असताना, इतर दोघे एक तरूण आणि तरूणी गाडीवर बसून किस करताना दिसले.

त्यांच्या मागे असलेल्या एका बाईकस्वाराने ही घटना त्याच्या फोनमध्ये कैद केली. बाईकस्वार जेव्हा त्या तिघांना भेटला तेव्हा त्यांनी त्याला धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा व्हिडिओ चेतन सूर्या नावाच्या वापरकर्त्याने सोशल मिडियावर शेअर केला आणि बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांना टॅग केली.

वाहनाच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून, पोलिसांनी बाईकस्वाराची ओळख पटवली आणि ४,००० रुपये दंड आकारून कारवाई केली.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT