Uttar Pradesh CM Yogi Adityanath Saam TV
देश विदेश

Viral Video: 'मिट्टी में मिला दूंगा', असदच्या एन्काउंटरनंतर योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ व्हायरल

Yogi Adityanath News : असदच्या एन्काउंटरनंतर योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ व्हायरल

Satish Kengar

Yogi Adityanath Viral Video : उमेश पाल हत्या प्रकरणी फरार असलेला माफिया डॉन अतिक अहमदचा मुलगा असद याला चकमकीत ठार केले आहे. यूपी एसटीएफच्या या कारवाईत आज शूटर मोहम्मद गुलामही या मारला गेला. यूपी पोलिसांच्या या कारवाईनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते विधानसभेत 'मिट्टी में मिला दूंगा...' म्हणताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांवरील कारवाईनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेले मुख्यमंत्री योगींचा हा व्हिडीओ (Viral Video) महिनाभरापूर्वीचा आहे. जेव्हा योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उत्तर प्रदेश विधानसभेत म्हटले होते की, माफिया कोणीही असो, सरकार त्याला उद्ध्वस्त करण्याचे काम करेल.  (Latest Political News)

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले होते की, 'हे गुन्हेगार आणि माफिया, हे कोणी वाढवले ​​आहेत? ज्याच्या विरोधात एफआयआर दाखल आहे, त्याला सपाने खासदार केले हे खरे नाही का? तुम्ही गुन्हेगाराला पाळता आणि नंतर तुम्हीच तमाशा करता. आम्ही या माफियांना जमीनीत गाढून टाकू.''

दरम्यान, माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमद याचा मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात फरार होते. त्यांच्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशी येथे ही चकमक झाली असून त्यांच्याकडून विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 9300 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयात केलं हजर

Sleep health: नाईट शिफ्ट आणि रात्री जागरणामुळे शरीरात नेमकं काय घडतंय? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

डायबिटीजचे रूग्ण फणस खाऊ शकतात का?| Jackfruit Eat In Diabetes?

Pakistan Airstrike: पाकिस्तानकडून मध्यरात्री अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक, ३७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT