Pakistani Drone Shot Down: सुरक्षा दलांनी उधळून लावला दहशतवादी कट, जम्मूत नियंत्रण रेषेजवळ ड्रोन पडला; शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त

Pakistani Drone Shot Down : सुरक्षा दलांनी उधळून लावला दहशतवादी कट, जम्मूत नियंत्रण रेषेजवळ ड्रोन पडला
Pakistani Drone Shot Down
Pakistani Drone Shot DownSaam Tv

Pakistani Drone News : जम्मूमधील राजोरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. राजौरीतील नियंत्रण रेषेजवळ बारीपट्टन भागात सुरक्षा दलांनी सीमेपलीकडून येणारे ड्रोन पाडला आहे. ड्रोनमध्ये शस्त्रे आणि रोख सीलबंद पॅकेटमध्ये होते. ही खेप तस्करांपर्यंत पोहोचण्याआधीच सुरक्षा दलांनी हा ड्रोन पाडला आहे.

सैन्याने जारी केलेल्या एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. यात सांगण्यात आले आहे की, 12-13 एप्रिलच्या मध्यरात्री राजौरीतील बेरी पट्टण भागात नियंत्रण रेषेजवळ ड्रोन संबंधित संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. कारवाईदरम्यान ड्रोन खाली पाडण्यात आले आहे.  (Latest Political News)

Pakistani Drone Shot Down
Asad Ahmed Encounter: मोठी बातमी! माफिया डॉन अतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर, यूपी एसटीएफची कारवाई

ड्रोनमधून पाच एके मॅगझिन, काही रोख रक्कम आणि एक सीलबंद पॅकेट जप्त करण्यात आले आहे. संबंधित भागात शोधमोहीम सुरू असल्याचे सैन्याने सांगितले.

याआधीही सैन्याने पाडले दहशतवाद्यांचे ड्रोन

याआधी 4 एप्रिल रोजी सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर दहा किलोमीटर आत ड्रोनने टाकलेल्या शस्त्रांचा साठा सापडला होता. यामध्ये शस्त्रे एका पॅकेटमध्ये ठेवण्यात आली होती. या पॅकेटमध्ये तीन पिस्तूल, चार ग्रेनेड्स आणि 48 काडतुसे होती.

Pakistani Drone Shot Down
BBC India : बीबीसीची अडचण वाढणार, ईडीने दाखल केला गुन्हा; निधीत अनियमितता झाल्याचा आरोप

तसेच 24 नोव्हेंबर 2022 रोजी पाकिस्तानी ड्रोनने चन्नी मन्हासा भागात असेच एक पार्सल टाकले होते. ज्यामध्ये दोन पिस्तूल, पाच लाख रोख (भारतीय चलन) आणि आयईडी जप्त करण्यात आला होता. पाकिस्तानात बसलेले दहशतवादी आता ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे, रोकड आणि ड्रग्जची खेप भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याला सुरक्षा दल वेळोवेळी उधळून लावत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com