Viral Video News
Viral Video News Saamtv
देश विदेश

Viral Video: वा रे पठ्ठ्या! भावाने केला असा देसी जुगाड, भन्नाट करामत पाहून IPS अधिकारीही चक्रावले, पाहा Viral Video

Gangappa Pujari

Viral Video: भारतात जुगाड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सोशल मीडियावर नेहमी एकापेक्षा एक असे भन्नाट जुगाड पाहायला मिळतात. हे जुगाड कधी आश्चर्याने थक्क करणारे असतात, तर कधी डोक्याला हात लावायला भाग पाडतात.

सध्या एका तरुणाच्या अशाच भन्नाट करामतीचा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून एका आयपीएस अधिकाऱ्यानेही त्याचे कौतुक केले आहे. (Viral Video)

आपल्या देशात असे जुगाड पाहायला मिळतात, जे जगाच्या पाठीवर क्वचितच दिसतील. देशातील तरुण कधी कोण कुठे डोके लावतील आणि चमत्कार घडतील याचा काही नेम नसतो. आणि अशा करामती लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच पाहायला मिळतात.

असाच व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. ज्यामध्ये एक असा जुगाड पाहायला मिळालाय की, पाहून तुम्ही थक्क व्हाल.

आपण सर्वांनी वॉशरूममध्ये लावलेल्या हँड ड्रायरने हात वाळवले असतील. भिंतीवर चिकटलेल्या या मशीनचे एकच काम आहे की ते काही सेकंदात आपले हात कोरडे करते. आपल्याला तरी इतकच माहित आहे.

पण याचा आणखी एक वापर आता समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती वॉशरूममध्ये लावलेल्या हँड ड्रायरखाली बसून आपले केस सेट करत ह आहे. या व्यक्तीच्या जबरदस्त जुगाडाने नेटकरी मात्र थक्क झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाथरूममध्ये बसून हँड ड्रायरच्या मदतीने केस सेट करताना दिसत आहे. त्याने हँड ड्रायरला हेअर ड्रायर मानलं आहे आणि तो त्याचा नेमका तसाच वापर करत आहे.

IPS अधिकारी आरिफ शेख यांनी आपल्या ट्विटर हँडलवर (Twitter) हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी “गरज ही अविष्काराची जननी आहे.” असा भारी कॅप्शन दिला आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकरीही जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT