Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे विजयाचं गणित आणखीनच गुंतागुतीचं झालंय. बारामतीत यंदा अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर शरद पवारांसाठी अस्तित्वाची लढाई आहे.
Supriya Sule Vs Sunetra Pawar
Supriya Sule Vs Sunetra PawarSaam Tv

Baramati Lok Sabha Constituency

>> भरत मोहळकर

साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे विजयाचं गणित आणखीनच गुंतागुतीचं झालंय. बारामतीत यंदा अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर शरद पवारांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. मात्र या मतदारसंघात 59 टक्के इतकंच मतदान झालंय.

घसरलेल्या मतदानामुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची धडधड वाढलीय. त्यामुळे सारं लक्ष आता खडकवासला विधानसभा मतदारसंघाकडे लागलंय. कारण बारामती लोकसभा मतदारसंघांतील सहा विधानसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि भोरमध्ये 'सामना' बरोबरीत सुटला किंवा सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली तरी ते लीड तोडण्याची ताकद एकट्या खडकवासला मतदारसंघात आहे.

Supriya Sule Vs Sunetra Pawar
Amit Shah News: खिचडी घोटाळा, कलम 370, राम मंदिर; जालन्यात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

2014 आणि 2019 मध्ये खडकवासला मतदारसंघाने सुप्रिया सुळे यांचं टेन्शन वाढवलं होतं. 2019 मध्ये 53 टक्के मतदान झालं होतं. त्यावेळी खडकवासलातून कांचन कूल यांना एकट्या खडकवासलातून 1 लाख 52 हजार 487 अशी विक्रमी मतं मिळाली होती. तर सुप्रिया सुळे यांना केवळ 85 हजार 983 मतं मिळाली होती. खडकवासलातून कांचन कुल यांना तब्बल 70 हजार मतांचं लीड मिळालं होतं.

त्याचं महत्वाचं कारण खडकवासला मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2014 मध्ये महादेव जानकर हे भाजपच्या चिन्हावर लढले नाहीत अन्यथा वेगळं चित्र असतं, असं विधान स्वत: अजित पवार यांनी केलंय.

Supriya Sule Vs Sunetra Pawar
JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

खडकवासला मतदारसंघात पाच लाख 38 हजार मतदार आहेत. मात्र या मतदारसंघात 50 टक्केच मतदान झालंय. त्यामुळे दोन लाख 70 हजार मतदारांनी मतदान केल्याचं गृहित धरल्यास आणि हे मतदान 2019 प्रमाणेच महायुतीच्या पारड्यात पडल्यास सुनेत्रा पवार यांना मोठा फायदा होऊ शकतो. मात्र सुप्रिया सुळे सलग दोन निवडणूकीत पिछाडीवर राहिल्याने त्यांनी अनेक सोसायट्यांना भेटी देत साखरपेरणी केली. मात्र ही साखरपेरणी कितपत कामाला येते? यावरच बारामतीचा खासदार कोण होणार आणि कुणाचा गेम होणार? हे स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com