Delhi Saloon Viral Video Saam Tv
देश विदेश

Viral Video : "सॉरी माझा हात सटकला..." सलूनमधील पुरुष कर्मचाऱ्याने तरुणीच्या ४ वेळा टीशर्टमध्ये हात घातला अन्...

Delhi Saloon Viral Video : दिल्लीतील एका सलूनमध्ये महिला ग्राहकासोबत मॉलिशच्या नावाखाली चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप असून कर्मचाऱ्याचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रकरणावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Alisha Khedekar

  • दिल्लीतील सलूनमध्ये महिला ग्राहकासोबत गैरवर्तन

  • सलून कर्मचाऱ्याचा माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल

  • पीडितेच्या मित्राने CCTV तपासल्याचा दावा

  • सोशल मीडियावर संताप व निलंबनाची मागणी

Delhi Saloon Girl Physically Harassment Video : दिल्लीतील एका सलूनमध्ये कर्मचाऱ्याने एका महिला ग्राहकाला मॉलिशच्या नावाखाली चुकीचा स्पर्श केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सलून कर्मचाऱ्याने माफी मागितल्याचा व्हिडिओ समोर आला असून या पुरुष कर्मचाऱ्याने चुकून हात घसरल्याचे म्हटले आहे. पीडित मुलीच्या मित्राने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एक सलून कर्मचारी कॅमेऱ्यात माफी मागतो आहे. तो म्हणतो आहे की, "सॉरी, सॉरी. माझी चूक झाली. माझा तसा काही हेतू नव्हता. माझा हात चुकून तिथे गेला. मला माफ करा, सॉरी." याच दरम्यान त्याच सलून मधील एका महिलेचा देखील आवाज ऐकू येत आहे. ती महिला कर्मचारी म्हणते आहे की, "सॉरी बोलेल तो. पण व्हिडिओ इंस्टावर टाकू नका प्लीज. मी हात जोडते. प्लीज अपलोड नका करु."

दरम्यान पीडित तरुणीच्या एका मित्राने या सलून कर्मचाऱ्याचा कबुली देताना व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओ खाली त्याने कॅप्शनमध्ये घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला आहे. तरुण म्हणाला की, माझी मैत्रीण सलूनमध्ये हेअर स्पासाठी गेली होती. मसाज कॉम्प्लिमेंटरी होता आणि सुरुवातीला फक्त डोक्यापुरता मर्यादित होता. त्यावेळी तिथे पुरुष कर्मचाऱ्याने मैत्रीणीचा खांद्यांचा मसाज करताना ४ वेळा कपड्यांमध्ये हात घातला आणि जाणूनबुजून अयोग्य ठिकाणी अश्लील स्पर्श केला.

शिवाय त्याने असेही म्हटले की हे सलून महिला चालवत आहेत. पण दिल्लीतील काही सलूनमध्ये पुरुष कर्मचारी देखील उपस्थित असतात. तरुण पुढे म्हणाला की, मी स्वतः या सलूनमधील सीसीटीव्ही चेक केला आहे. आणि त्यामध्ये सलूनमधील कर्मचारी अश्लील वर्तन करताना दिसून आला. मी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यास सांगितले आहे. आणि मी हा व्हिडिओ फेम मिळण्याच्या हेतूने नाही तर यापुढे अशी घटना कोणासोबत घडू नये यासाठी सोशल मीडियावर टाकत असल्याचंही तरुणाने म्हटलं. दरम्यान या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत. काही जणांनी संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी त्याच्या निलंबनाची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

SCROLL FOR NEXT