Truth Behind Viral Condom Video Saam
देश विदेश

गर्ल्स हॉस्टेलमध्ये वापरलेल्या कंडोमचा खच; घटनेमागचं सत्य काय? 'हा' व्हिडिओ नेमका कुठला?

Truth Behind Viral Condom Video: सोशल मीडियावर दिल्लीतील मुलींच्या वसतिगृहातील व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये कंडोमचा खच. पण व्हिडिओ दिल्लीतील नसल्याचं समोर.

Bhagyashree Kamble

सोशल मीडियावर सध्या गटारात कंडोमचा ढीग असणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील मुलींच्या वसतिगृहातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुलींच्या वसतिगृहात इतके कंडोम वापरले गेले की, यामुळे गटार तुंबले. गेल्या २ - ३ दिवसांपासून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, हा व्हिडिओ दिल्लीतील नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

१९ सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका इमारतीच्या तळमजल्यावरील ड्रेनेज सफाईसाठी उघडल्याचे दिसून येत आहे. तसेच बाहेर वापरलेल्या कंडोमचा ढीग साचलेला दिसून येत आहे. फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ दिल्लीतील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अनेक नेटकऱ्यांनीही हा व्हिडिओ दिल्लीतील गर्ल्स हॉस्टेलचा असल्याचा दावा केला आहे. मात्र, या व्हिडिओची पडताळणी केली असता, वेगळंच सत्य समोर आलं आहे. या व्हिडिओचा तपास रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपास करण्यात आला. तपासात हा व्हिडिओ अफ्रिकेतील सोशल मीडिया चॅनेलवर शेअर करण्यात आल्याची माहिती समोर आली.

'क्रेझी बडीज' नावाच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एका नायजेरियन व्यक्तीनं १७ ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करत त्यानं कॅप्शन लिहिलं होतं. 'घरातून अनेक दिवसांपासून दुर्गंधी येत होती. तेव्हा ड्रेनेजमध्ये काही अडकल्याचा संशय होता. जेव्हा ड्रेनेज उघडण्यात आले, तेव्हा वापरलेले कंडोम्स दिसले. कंडोम्सचा खच पाहायला मिळालं. यामुळे सर्वांनाच धक्का बसला'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT