शरीरसंबंध ठेवण्यास बायकोचा नकार; नवऱ्यानं छतावरून फेकलं, नेमकं काय घडलं?

Man Throws Wife From Terrace Over Intimacy Dispute: शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्यानं बायकोला छतावरून फेकलं. पीडित महिला गंभीर जखमी.
Man Throws Wife From Terrace Over Intimacy Dispute
Man Throws Wife From Terrace Over Intimacy DisputeSaam Tv
Published On

उत्तरप्रदेशातील झाशीमधून पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे पतीनं पत्नीला छतावरून फेकून दिलंय. ही संपर्ण घटना मऊरानीपूर पोलीस स्टेशन परिसरातून उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी महिलेला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाशीतील मऊरानीपूर पोलीस स्टेशन परिसरात आरोपी मुकेश अहिरवार पत्नी तीजासोबत राहत होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता. पत्नी तीजाने सांगितले की, 'पती मुकेश लग्न करण्यापूर्वी भेट घेण्यासाठी कायम घरी यायचा. कुटुंबियांनी आम्हा दोघांना रंगेहाथ पकडलं. २०२२ साली दोघेही लग्नबंधनात अडकलो. लग्नाच्या वर्षभरानंतर पतीचे वर्तन बदलले. पती कायम भांडत होता'; अशी माहिती पत्नीनं दिली.

Man Throws Wife From Terrace Over Intimacy Dispute
दोन आलिशान वाहनांची एकमेकांना टक्कर, बिझनेसमॅन, पत्नी अन् मुलीचा जागीच मृत्यू; ४ जण गंभीर जखमी

तीजाच्या म्हणण्यानुसार, मुकेशनं घटनेच्या आदल्या दिवशी तिच्यावर जबरदस्ती केली होती. तीजाने पतीचा विरोध केला होता. 'जर तुम्हाला माझी काळजी नसेल कर, माझ्यासोबत का शरीरसंबंध ठेवायचा आहे?', असा प्रश्न तीजाने विचारला. तेव्हा मुकेशला राग अनावर झाला. मुकेशनं तीजावर हात उगारला. तिला मारहाण केली. तसेच छतावरून ढकलून दिले.

तीजाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तिला तातडीने जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मऊरानीपूर कम्युनिटी सेंटरचे डॉक्टर डॉ. रवींद्र गुप्ता यांनी सांगितले की, 'जखमी महिलेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील सदस्यांचा दावा की कुणीतरी तीजाला छतावरून ढकलून दिले. सध्या महिलेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे'.

Man Throws Wife From Terrace Over Intimacy Dispute
'ती फक्त तळहातावर सुसाईड नोट लिहून...' डॉक्टर तरूणीच्या भावाला वेगळाच संशय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com