तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह टांगून शहरातून फिरवलं? VIRAL VIDEO मागील सत्य Saam Tv
देश विदेश

तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह टांगून शहरातून फिरवलं? VIRAL VIDEO मागील सत्य

२० वर्षाच्या मोठ्या लढ्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तान मधून आपले सैन्य माघार घेतले आहे. ३० ऑगस्टला अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तान सोडले आहे.

सांम टीव्ही न्यूज

वृत्तसंस्था : २० वर्षाच्या मोठ्या लढ्यानंतर अमेरिकेने America अफगाणिस्तान afghanistan मधून आपले सैन्य माघार घेतले आहे. ३० ऑगस्टला अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तान सोडले आहे. यादरम्यान आपली अनेक हत्यारे, एअरक्राफ्ट आणि वाहनही त्यांनी काबूलमध्ये Kabul सोडले आहे. यानंतर आता अफगाणिस्तानवर तालिबानने पूर्णपणे कब्जा केला आहे. तालिबान कब्जा करताच अफगाणिस्तान मधून अनेक विचित्र घटना समोर येत आहेत.

अशात आता आणखी एक व्हिडिओ VIDEO समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये एका व्यक्तीला हेलिकॉप्टरला लटकवले गेले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर Social media मोठ्या प्रमाणात व्हायरल VIRAL देखील झाला आहे. सोशल मीडियावर असा दावा केले आहे की, अमेरिकन सैन्याच्या American Forces वापसीनंतर विमानतळावर एक हेलिकॉप्टर उडत होते. याला एक व्यक्ती लटकलेला होता.

हे देखील पहा-

असा दावा केला जात होता की, अमेरिकी सैन्याची मदत केल्याप्रकरणी या व्यक्तीला तालिबानने शिक्षा दिली आहे. अमेरिकेच्या सैन्य वापसीनंतर तालिबानने आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये हा दावा केला जात असताना, आता अफगाणिस्तानच्या पत्रकारांनी या व्हायरल व्हिडिओ विषयी वेगळेच सत्य समोर आणले आहे. ज्या हेलिकॉप्टरला हा व्यक्ती लटकला आहे, ते अमेरिकी हेलिकॉप्टर हॉक होते.

सोशल मीडियावर तालिबानी शिक्षेचा दावा केला जात असताना, स्थानिक पत्रकारांनी या व्हिडिओचे सत्य सांगितल्याने सर्वजण हैराण झाले आहे. जो व्यक्ती हेलिकॉप्टरला लटकला आहे, तो तब्बल १०० मीटर उंच झेंडा फडकवण्याचे काम करत होता. म्हणजेच त्याला कोणतीही शिक्षा दिली जात नव्हती. हेलिकॉप्टरला लटकलेला व्यक्ती गो एक तालिबानीच आहे, जो झेंडा लावण्याकरिता लटकलेला होता.

हेलिकॉप्टरच्या मदतीने तो हे काम करत होता. मात्र, यात तो अयशस्वी ठरला आहे. अमेरिकी पत्रकाराने पोस्ट केलेल्या व्हिडिओचे उत्तर देत अफगाण पत्रकार बिलालने ट्विट करत सांगितले आहे की, जो व्यक्ती हेलिकॉप्टर उडवत आहे. त्याला अमेरिका आणि यूएईमध्येच ट्रेनिंग दिले गेले आहे. व्हिडिओ मध्ये एक तालिबानी व्यक्ती आहे.

जो झेंडा फ़डकवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामध्ये अपयशी ठरला आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये असे दिसत आहे की, या व्यक्तीला दोरीच्या मदतीने हेलिकॉप्टरला लटकवले आहे. मात्र, व्हिडिओ झूम करून बघितल्यास दिसते, की या व्यक्तीला बांधले गेले आहे. जेणेकरून तो झेंडा लावू शकणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT