Delhi News : नवी दिल्लीमध्ये शनिवारी रात्री रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला. यात १४ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले होते.
या चेंगराचेंगरीच्या घटनेदरम्यान सोशल मीडियावर एका आरपीएफच्या महिला कॉन्स्टेबलच्या फोटोची चर्चा होत आहे. आपल्या छोट्या लेकराला घेऊन कवेत घेऊन ही महिला कॉन्स्टेबल ड्यूटी करत असल्याचे फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हा मायलेकाचा लोभसवाणा फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या महिलेचे नाव रीना असल्याचे म्हटले जात आहे. रीनाचा फोटो एका पत्रकाराने शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'दिल्ली रेल्वे स्टेशनवर आरपीएफची महिला कॉन्स्टेबल रीना ड्यूटी करत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गदारोळ होऊ नये यासाठी रीना प्रवाशांना सतर्क करत आहे. त्यांना मदत करत आहे', असे म्हटले आहे.
रीनाने बेल्टच्या मदतीने तिच्या बाळाला पोटाशी बांधल्याचे फोटोमध्ये दिसते. तिच्या पोटाशी तिचे बाळ आणि मागे हातांमध्ये पोलिसांची काठी आहे. या अर्थपूर्ण फोटोची सर्वत्र चर्चा होत आहे. कुटुंब आणि कर्तव्य या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडणाऱ्या या कॉन्स्टेबलचे नेटकरी कौतुक करत आहेत. अनेकजण हा फोटो पाहून भावूकदेखील झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.