Viral News Saam TV
देश विदेश

Viral News : कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कंपनीकडून भन्नाट सूट; स्क्रीनवरील मॅसेज वाचून स्वतःच्या डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

घरी लवकर जायचं आहे, बायको वाट पाहते, आईला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, अशा अनेक कारणांसाठी कर्मचारी घाईने काम उरकण्याचा प्रयत्न करतात.

Ruchika Jadhav

Viral Photo : ऑफिसचं काम कितीही करा ते संपतचं नाही. दर महिन्याला प्रत्येकाला टार्गेट दिलं जातं. ते पूर्ण न झाल्यास काही ठिकाणी पगारावर देखील परिणाम होतो. घरी लवकर जायचं आहे, बायको वाट पाहते, आईला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, अशा अनेक कारणांसाठी कर्मचारी घाईने काम उरकण्याचा प्रयत्न करतात. अशात काही वेळा तर संगणक किंवा लॅपटॉप बंद पडावा आणि आपली सुटका व्हावी असाही विचार मनात येतो. तुमच्याही मनात असा विचार हमखास आला असेल. मात्र स्वप्नात असलेला हा विचार आता सत्यात पूर्ण होताना दिसत आहे. (Latest Viral News)

एका कंपनीत कर्मचारी काम करताना त्यांची कामाची वेळ संपली की, स्क्रीनवर आपोआप ' काम बंद करा आणि घरी जा ' असा मजकूर लिहून येतो. हो हे खरं आहे आणि तुम्ही ब्रोबरचं वाचत आहात. सध्या सोशल मीडियावर या ऑफिसची आणि तेथील अशा सुविधांची भलतीच चर्चा रंगली आहे.

इंदौर येथील सॉफ्टग्रिड कंप्यूटर्स या आयटी कंपनीच्या एका महिला कर्मचारीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये लिहिलं आहे की, ' तुमच्या कामाचे तास पूर्ण झाले आहेत. 10 मिनिटात तुमचा लॅपटॉप बंद होईल. तुमची घरी जाण्याची वेळ झाली आहे. लवकर काम बंद करा...' असं थेट स्क्रीनवर लिहून आलेलं दिसत आहे.

हा फोटो पाहून अनेक व्यक्ती चक्रावल्या आहेत. हे खोटं किंवा बनावट आहे असं काहीना वाटत आहे. मात्र हे खोटं नसून सत्य घटना आहे. महिलेने ऑफिसमधील कॉम्प्युटर स्क्रीनवर आलेल्या मजकुराविषयी पुढे म्हटले आहे की, आमची कंपनी कर्मचाऱ्यांची काळजी घेते. त्यांचे काम आणि कुटुंब यांनी वेळ देता यावा यासाठी नियोजित वेळेतच काम पूर्ण करण्यास सांगते.

दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास अनेक जण जास्त वेळ ऑफिसमध्ये बसून राहतात आणि काम पूर्ण करतात. मात्र या कंपनीमध्ये सुरुवातीला 10 मिनिटं आधी हा संदेश स्क्रीनवर येतो. यानंतरही कर्मचारी काम करत असेल तर कॉम्प्युटर आपोआप बंद होतो. असं येथील कर्मचारी सांगतात. आयटी कंपनीच्या महिला कर्मचारीने LinkedIn वर याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यात LinkedIn वर महिला कर्मचारीने हा फोटो पोस्ट केला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू. आतापर्यंत 6 लाख 60 हजार व्यक्ती या व्हिडिओला पाहिला आहे. तसेच 6 हजारां पेक्षा जास्त रिपोस्ट आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा धुडगूस; नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण, एकाला जबर मारहाण करून लुटलं

Maharashtra Live News Update: मुंबई उच्च न्यायालयासमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Bombay Masala Sandwich Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा बॉम्बे मसाला सँडविच, वाचा झटपट होणारी रेसिपी

ठरलं! मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार? महाविकास आघाडीचं काय होणार? VIDEO

New cricket stadium: अमेरिकेच्या भूमीवर क्रिकेटचा नवा अध्याय; ला-ग्रेंजमध्ये भव्य क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन

SCROLL FOR NEXT