Pakistani Man marries 70-year-old Canadian Woman Saam Tv
देश विदेश

Viral News: पाकिस्तानचा नईम कॅनडाच्या 'आजी'च्या प्रेमात, 70 वर्षाच्या महिलेशी केलं लग्न...

Pakistan Viral News: पाकिस्तानचा नईम कॅनडाच्या 'आजी'च्या प्रेमात, 70 वर्षाच्या महिलेशी केलं लग्न...

Satish Kengar

Pakistan Viral News:

एका पाकिस्तानी तरुणाने कॅनडाच्या वयोवृद्ध महिलेसोबत लग्न केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या दोघांच्या वयात तब्बल 35 वर्षांचं अंतर आहे. नईम शहजाद 35 वर्षांचा आहे. तर त्याची पत्नी 70 वर्षांची आहे.

पाकिस्तानातील गुजरातमधील रहिवासी असलेल्या नईमने 2017 मध्ये फेसबुकवर त्यांची भेट झाल्याचं सांगितलं. महिलेने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यावर ते एकमेकांशी बोलू लागले आणि हळूहळू त्यांची मैत्री झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. नईमने वयाचं बंधन तोंडात या महिलेला लग्नाचा प्रस्ताव दिला.

या दोघांच्या वयामध्ये इतकं यानंतर असल्याने अनेकांनी या नात्यावर आक्षेप घेतला. यानंतरही या महिलेने पाकिस्तानात जाऊन नाईमशी लग्न केलं. याबद्दल बोलताना नईमने सांगितले की, तो आपल्या पत्नीसह कॅनडाला जाण्याचा विचार करत आहे. मात्र त्याचा व्हिसा अर्ज नाकारण्यात आला आहे. तो पुन्हा व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्याने सागितलं.   (Latest Marathi News)

नईमचे म्हणणे आहे की, त्याने फक्त कॅनडाला जाण्यासाठी लग्न केले नाही. त्याने सांगितले की, त्याने या महिलेवर त्याच प्रेम असल्याने लग्न केलं आहे. तसेच त्याची पत्नी त्याला आर्थिक मदत करते. नईमने सांगितले की, त्याच्या पत्नीला त्याने काम करावे असे वाटत नाही. कारण याचा त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, सोशल मीडियावर लोक नईमचे त्या महिलेवर प्रेम नसून त्याने फक्त पैशांसाठी लग्न केलं असल्याचं बोलत आहेत. त्यावर होतं असलेल्या टीकेदरम्यान नईमने एक मुलाखत दिली आहे. ज्यात त्याने सांगितले होते की, जवळपास 10 वर्षांपूर्वी त्याची पत्नी आणि तो फेसबुकवर मित्र बनले होते. दोघांनी 2017 मध्येच लग्न केलं. नईमने सांगितले की, उत्पन्नाचे अधिक स्रोत मिळवण्यासाठी दोघेही YouTube चॅनल सुरू करण्याचा विचार करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT