India's Slowest Train Saam Tv
देश विदेश

Indian Railways Slowest Train: 'ही' आहे देशातील सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे; 5 तासात फक्त 46 किलोमीटर अंतर कापते

Mettupalayam Ooty Nilgiri Passenger Train Is Indias Slowest Train: 'ही' आहे देशातील सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे; 5 तासात फक्त 46 किलोमीटर अंतर कापते

Satish Kengar

India's Slowest Train: भारतीय रेल्वे लोकांना सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. एकीकडे बुलेट ट्रेनचे काम अनेक वर्षांपासून सुरू असताना दुसरीकडे वंदे भारतसारख्या (Vande Bharat Train) हायस्पीड रेल्वे सुरू करण्यात येत आहेत. लोकांना नेहमीच आपला वेळ वाचवायचा असतो. यामुळेच फास्ट गाड्या खूप लोकप्रिय आहेत.

यातच आपण आज एका अशा रेल्वे बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा वेग इतका कमी आहे की तुम्ही म्हणाल, 'या पेक्षा सायकल बरी.' रेल्वे पाच तासात फक्त 46 किलोमीटरचं अंतर कापते.

मेट्टुपालयम उटी निलगिरी पॅसेंजर रेल्वे ही भारतातील सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे आहे. ही रेल्वे 10 किमी प्रतितास वेगाने धावते. जी भारतातील सर्वात वेगवान रेल्वेच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही रेल्वे 46 किमीचे अंतर अंदाजे पाच तासांत कापते. ही रेल्वे डोंगराळ प्रदेशामुळे इतक्या कमी वेगाने धावते. असं असलं तरी ही रेल्वे धावताना आजूबाजूचे नयनरम्य दृश्य पाहून तुम्हाला तुमचा वेळ कसा गेला हे कळणार नाही. (Latest Marathi News)

दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा विस्तार म्हणून या रेल्वेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. युनेस्कोच्या वेबसाइटनुसार, निलगिरी माउंटन रेल्वेचे बांधकाम 1854 मध्ये करण्यात आले होते. मात्र पर्वतीय स्थानाच्या अडचणीमुळे 1891 मध्ये काम सुरू झाले आणि 1908 मध्ये पूर्ण झाले. युनेस्कोने असेही म्हटले आहे की, ही रेल्वे 326 मीटर ते 2,203 मीटर उंचीवर पोहोचते, जे त्यावेळचे नवीन तंत्रज्ञान होते.

IRCTC च्या माहितीनुसार, ही रेल्वे 46 किमी प्रवासादरम्यान अनेक बोगदे आणि 100 हून अधिक पुलांवरून जाते. खडकाळ प्रदेश, चहाचे मळे आणि घनदाट जंगलातील टेकड्या यामुळे राइड सुंदर बनते. मेट्टुपालयम ते कुन्नूरपर्यंतच्या भागावर सर्वात विहंगम दृश्य आहे.

या रेल्वेची सेवा मेट्टुपालयम ते उटी दरम्यान धावते. रेल्वे मेट्टुपालयम येथून सकाळी 7.10 वाजता सुटते आणि दुपारी 12 वाजता उटीला पोहोचते. IRCTC ने सांगितले की, परतीच्या प्रवासादरम्यान रेल्वे उटीहून दुपारी 2 वाजता सुरू होते आणि 5.35 वाजता मेट्टुपालयमला पोहोचते. या मार्गावरील मुख्य स्थानके कुन्नूर, वेलिंग्टन, अरवांकडू, केट्टी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

SCROLL FOR NEXT