Indian Railways News Saam Tv
देश विदेश

Viral News : प्रवाशांच्या 'या' चुकीमुळे रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले तब्बल 70 कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

Indian Railways Latest News : प्रवाशांच्या 'या' चुकीमुळे रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले 70 कोटी रुपये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Latest News : लोकल ट्रेन ही मुंबईची (Mumbai) लाईफ लाईन मानली जाते. भारतात रेल्वेचं (Indian Railways) मोठं जाळं पसरलं आहे. खिशात पैसे नसले तरी अनेकजण मनात कसलीही भीती न बाळगता विनातिकीट रेल्वेने एकदम बिनधास्त प्रवास करतात. मात्र प्रवाशांच्या याच चुकीमुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फायदा झाला आहे. नुकतीच 2022-23 या आर्थिक वर्षातील रेल्वेची आकडेवारी समोर आली आहे. ज्यात विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेने एवढा मोठा दंड वसूल केला आहे की तुम्ही वाचून थक्क व्हाल. (Latest Marathi News)

दंडात्मक कारवाईतून रेल्वेच्या तिजोरीत तब्बल 70.29 कोटी रुपये जमा

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये पूर्व उत्तर रेल्वे, लखनौ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक आदित्य कुमार आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक अंबर प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली लखनौ विभागातील वेगवेगळ्या स्थानकांवर विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरोधात मोहीम राबवण्यात आली.

तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गत सुमारे 70.29 कोटी रुपयांचा रेल्वे महसूल दंडाच्या रूपात प्राप्त झाला आहे. जे मागील वर्षी रेल्वेच्या 69 कोटी 84 लाखांच्या महसुलापेक्षा 17 टक्के अधिक आहे. रेल्वे प्रशासनातील 11 तिकीट तपासणी कर्मचार्‍यांमुळे हे शक्य झाले असल्याचं सांगण्यात येत आहेत. यात रिजवान उल्लाह आणि जगप्रीत सिंह असे दोन कर्मचारी टीटीआय आहेत. (Uttar Pradesh Latest News)

रेल्वेकडून सातत्याने सुरु आहे जनजागृती मोहीम

वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर अंबर प्रताप सिंह यांनी सांगितले की, विनातिकीट ट्रेनमध्ये प्रवास करणे गुन्हा आहे. अशा स्थितीत तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गतच एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेच्या बाजूने अशा मोहिमा सातत्याने सुरू असतात. (Indian Railways Latest News)

दरम्यान, अशा कारवाईतून रेल्वेकडे अधिक महसूल जमा होत असल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून रेल्वेकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमा यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना अनेकदा विनातिकीट ट्रेनमध्ये प्रवास न करण्याची विनंती केली जाते. असे असूनही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर तिकीट तपासणीवेळी त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Ganesh: अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन, वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon Crime : विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीचा घरात घुसून पत्नीवर प्राणघातक हल्ला

STD, ISD आणि PCO चा फुलफॉर्म काय? या तिघांमधील फरक तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या एका एका क्लिकवर

Maharashtra Election : भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार? किंगमेकरसाठी शिंदे-दादांमध्ये स्पर्धा?

VIDEO: संभ्रम नाहीच, तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या, पण.. ; जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT