Sikkim Avalanche: मोठी बातमी! सिक्किममध्ये भीषण हिमस्खलन; 6 जणांचा मृत्यू, शेकडो पर्यटक अडकल्याची भीती

Huge Avalanche In Sikkim: हिमस्खलनात एका लहान मुलासह 6 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार भीषण हिमस्खलनामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Massive Avalanche in Sikkim
Massive Avalanche in SikkimANI
Published On

Breaking News : सिक्कीममधील नाथुला पर्वताजवळ (Nathu La mountain) त्सोमगो (Tsomgo) येथे हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या हिमस्खलनात अनेक पर्यटक अडकल्याची माहिती भिती व्यक्त केली जात आहे.

मीडियार रिपोर्टनुसार हिमस्खलनात एका लहान मुलासह 6 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार भीषण हिमस्खलनामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 150 पर्यटक बर्फात अडकल्याचे वृत्त आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Massive Avalanche in Sikkim
Devendra Fadnavis News: नेमकं फडतूस कोण हे अख्य्या महाराष्ट्राला महिती, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

मिळालेल्या माहितीनुसार सिक्कीमच्या नाथुला सीमा भागात मंगळवारी प्रचंड हिमस्खलन झाले. दुपारी 12.20 च्या सुमारास हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. गंगटोक आणि नथुला यांना जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावरील १४व्या मैलावर झालेल्या हिमस्खलनानंतर आतापर्यंत २२ पर्यटकांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती बीआरओने दिली आहे.

350 पर्यटक, 80 वाहनांची सुटका

या घटनेनंतर रस्त्यावरून बर्फ हटवून अडकलेले 350 पर्यटक आणि 80 वाहनांची सुटका करण्यात आली. घटनास्थळी मदत पथके दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. 150 हून अधिक लोक अडकल्याची भीती आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या हिमस्खलनात 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना राजधानी गंगटोक येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Massive Avalanche in Sikkim
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: 'फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही'; उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर थेट टीका

नाथुला हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ

हिमस्खलन झालेलं नाथुलातील हे ठिकाण हे चीनच्या सीमेवर वसलेले आहे असून नैसर्गिक सौंदर्यामुळे हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे घटनेवेळी येथे मोठ्या संख्येने पर्यटक होते अशी माहिती मिळतेय.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कुपवाडा जिल्ह्यात पुढील २४ तासांत कमी धोक्याची पातळी असलेले हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या भागात राहणाऱ्या लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हिमस्खलनप्रवण भागात जाण्याचे टाळावे असे आवाहन जम्मू काश्मीर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (JKDMA) केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com