vinesh Phogat  Saam tv
देश विदेश

vinesh Phogat : विनेश विधानसभेच्या मैदानात, काँग्रेसकडून हरियाणा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर, बजरंग पुनियाला मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

haryana assembly election 2024 : काँग्रेसने हरियाणा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये विनेश फोगाटचाही समावेश आहे. त्यामुळे विनेश विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाटने हरियणा विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचा हात धरला होता. त्यानंतर काँग्रेसने आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी ३१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटचाही समावेश आहे. तर बजरंग पुनिया निवडणूक लढणार नाही. मात्र, काँग्रेसने बजरंगला काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे.

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विनेश फोगाटने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर विनेश काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर आज विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताच विनेश म्हणाली, 'आता दुसऱ्या खेळाडूंना खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीतून मी गेली आहे'.

विनेश फोगाट ही जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. जुलाना मतदारसंघाशी तिचं खास नातं आहे. या जुलाना विधानसभा मतदारसंघात तिच्या पतिचं गाव आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी विनेशचे कुटुंबीयांनी या मतदारसंघाचा दौरा सुरु केला होता.

जुलाना मतदारसंघ हा जाट बहुल मानला जातो. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेजेपीचे अमरजीत ढांडा यांनी विजय प्राप्त केला होता. २००९ ते २०१९ सालापर्यंत इंडियन नॅशनल लोकदलाचा कब्जा होता.

दरम्यान, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यतेसाठी विनेश फोगाट यांनी रेल्वेचा राजीनामा दिला. विनेश फोगाट ही उत्तर रेल्वेत ओएसटी पदावर तैनात होती. विनेशने राजीनामा दिल्यानंतर म्हणालं की, 'रेल्वेमधील सेवा आयुष्यात सदैव आठवणी राहणारी आहे. मी रेल्वे कुटुंबाचे नेहमी आभार मानेल. दरम्यान, विनेश फोगाटचं मासिक वेतन १ लाखांहून अधिक होतं.

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ३१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटच्य नावासहित भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT