ED FILES CASE AGAINST 29 SOUTH STARS Saam Tv News
देश विदेश

Film Industry: सिनेइंडस्ट्री ED च्या रडारावर, तब्बल २९ सेलिब्रिंटींवर मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय ?

South Film Industry Faces Heat: बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्सच्या जाहिरात प्रकरणात ईडीने २९ साऊथ स्टार्सविरोधात कारवाई केली आहे. विजय देवराकोंडा, राणा दग्गुबातीसह अनेक स्टार्स अडचणीत आले आहेत.

Bhagyashree Kamble

बॉलिवूडनंतर आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर ईडीचं सावट पडलं आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅप्सच्या प्रोमोशनप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) साऊथ इंडिस्ट्रीतील २९ स्टार्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी बॉलिवूड स्टार्सविरूद्ध अशी कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता साऊथ स्टार्सच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बेकायदेशीर बेटिंग अॅप्सच्या जाहिरातीचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याप्रकरणी ईडीने कारवाई करत २९ साऊथ स्टार्सविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या यादीत विजय देवराकोंडा, राणा दग्गुबाती, प्रकाश राज, मंचू लक्ष्मी, निधी अग्रवाल आणि अनन्या नगल्ला अशा दिग्गज कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध व्यावसायिक फणींद्र शर्मा यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारीत हैदराबादमधील साइबराबाद पोलिसांनी एफआयआरची नोंद केली.

गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू

गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. लवकरच या प्रकरणाशी संबंधित महत्वाचे अपडेट्स बाहेर येऊ शकतील. बेकायदेशीर बेटिंग अॅप्समुळे दरवर्षी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. यात आता ईडीची कारवाई होत आहे.

या प्रकरणात विजय देवराकोंडा आणि राणा दग्गुबातीसारख्या बड्या स्टार्सची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या साऊथ स्टार्सच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅपप्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईमुळे साऊथ स्टार्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे रेल्वे स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला पोलिसांनी दिल्लीतून घेतलं ताब्यात

हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर अगोदर शरीर तुम्हाला देतं 'हे' संकेत

Ganesh Utsav 2025 : लाडक्या गणूला नेमके २१ मोदकच का अर्पण केले जातात?

First iPhone: जगातील पहिल्या iPhoneची किंमत किती होती आणि कधी लाँच झाला?

Tejashree Pradhan First Love : तेजश्री प्रधानचे पहिले प्रेम होता क्रिकेटर, का पडली होती प्रेमात?

SCROLL FOR NEXT