rahul gandhi Saam Tv
देश विदेश

''थिम क्या है'', राहुल गांधींचा तेलंगणातील 'तो' व्हिडिओ भाजपकडून शेअर

मागच्या काही दिवसांपासून राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप (BJP) यांच्यात ट्वीटर वॉर सुरु आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: मागच्या काही दिवसांपासून राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि भाजप (BJP) यांच्यात ट्वीटर वॉर सुरु आहे. राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडिओ ताजा असतानाच आता भाजपच्या नेत्याकडून राहुल गांधींचा आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधी तेलंगणातील काँग्रेस नेत्यांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी राज्यात सध्या काय चालले आहे आणि त्यांना आपल्या भाषणात काय बोलायचे आहे याचा आढावा घेत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना भाजपच्या नेत्याने लिहिले आहे की राहुल गांधी तेलंगणामधील आपल्या भाषणाच्या अगोदर काँग्रेस नेत्यांना विचार आहेत की थिम काय आहे, काय बोलायचे आहे? असे तेव्हा होत जेव्हा तुम्ही सतत खासगी विदेश दौऱ्यावर असता किंवा नाईट क्लबमध्ये राजणाकरण करत असता.

याआधीही भाजप नेत्याने केला राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर

अमित मालवीय यांनी यापूर्वीही राहुल गांधींचा 'नाइट क्लब'चा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये राहुल गांधी पार्टी करताना दिसत होते. व्हिडिओ शेअर करताना भाजप नेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, '2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते. आज त्यांच्या पक्षात गदारोळ सुरू असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत. त्यांचे हे सुरूच आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसमध्ये राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसने दिले स्पष्टीकरण

व्हिडिओ शेअर केल्यानंतर काँग्रेसला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपला प्रत्युत्तर देताना म्हटले की, राहुल गांधी एका खाजगी विवाह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नेपाळला गेले होते. निमंत्रणाशिवाय तिथे गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मित्राच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या लग्नाला उपस्थित राहणे हा गुन्हा नाही. येथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला आणि सांगितले की, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाला उपस्थित राहणे हा गुन्हा नाही कारण हा संघाच्या विपरीत आमच्या संस्कृतीचा भाग आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT