नवी दिल्ली: पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत शनिवारी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन धनखड यांच्या नावाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगदीप धनखड यांचे अभिनंदन केले. (vice president election 2022 Jagdeep Dhankhar News Update)
भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत शनिवारी संध्याकाळी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या (vice president election 2022) नावावर चर्चा झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या नावाची घोषणा केली.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) उपस्थित होते. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तत्पूर्वी धनखड यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
धनखड यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले. 'शेतकरीपुत्र जगदीप धनखड हे आपल्या विनम्र स्वभावामुळे ओळखले जातात. ते संविधानाचे उत्तम जाणकार आहेत. विधीमंडळाच्या कामकाजाचे त्यांना संपूर्ण ज्ञान आहे. ते राज्यपाल आहेत. त्यांनी नेहमीच शेतकरी, तरूण, महिला आणि वंचितांच्या कल्याणासाठी काम केले आहे. ते आपले उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत याचा आनंद आहे. ते राज्यसभेचे सभापती म्हणून देशाला पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने सदनातील कार्यवाहीत मार्गदर्शन करतील असा मला विश्वास आहे, ' असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६ ऑगस्टला मतदान
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार १९ जुलै रोजीपर्यंत आपला अर्ज दाखल करू शकतात. उमेदवारी अर्जांची छाननी २० जुलै रोजी होईल. २२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. देशाचे पुढील उपराष्ट्रपती निवडण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.