मोठी बातमी! भाजपकडून उपराष्ट्रपदासाठी जगदीप धनखड यांना उमेदवारी

भाजपने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankhar Saam Tv

नवी दिल्ली : भाजपने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. उपाध्यक्षपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी शनिवारी भाजपची (BJP) सर्वोच्च धोरण ठरविणाऱ्या संसदीय मंडळाची बैठक झाली. भाजपच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

देशाच्या उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी संसद, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य सामील असतात. संसदेचे सध्याचे संख्याबळ ७८० आहे. त्यापैकी केवळ भाजपचे ३९४ खासदार आहेत. विजयासाठी ३९० पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै असून मतदान ६ ऑगस्टला होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्यास त्या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. एनडीएने २०१७ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले होते.

Jagdeep Dhankhar
रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यास बलात्काराचा गुन्हा होऊ शकत नाही: सुप्रीम कोर्ट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासह अनेक राज्यपालांची भेट घेतली होती. याबाबत राजकीय चर्चाही रंगल्या होत्या. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांनीही मोदींची भेट घेतली होती. धनखर यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. अखेर आज उपराष्ट्रपदाच्या निवडणुकासाठी भाजपकडून (BJP) पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com