...म्हणून द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला; संजय राऊत काय म्हणाले? वाचा...

द्रौपदी मुर्मू आज मुंबईत येणार आहेत.
Sanjay Raut Latest News, President Election 2022, Draupadi Murmu Latest News
Sanjay Raut Latest News, President Election 2022, Draupadi Murmu Latest Newssaam tv

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. द्रौपदी मुर्मू आज मुंबईत येणार आहेत. यानिमित्ताने पाठिंबा देणाऱ्या पक्षांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. असं असतांना द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut Latest News)

Sanjay Raut Latest News, President Election 2022, Draupadi Murmu Latest News
महाराष्ट्राची अवस्था अनाथ लेकरासारखी; अतुल लोंढेंची मुख्यमंत्र्यांसह भाजपवर बोचरी टीका

'द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं कोणत्याही राजकीय फायद्यासाठी पाठिंबा दिला नाही. ही आमची भावना आहे. आदिवासी समाजाबाबतचा आदर आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला आहे, शिवसेनेत अनेक आदिवासी कार्यकर्ते आहेत. आदिवासी कार्यकर्त्यांचा आग्रह होता. म्हणून निर्णय घेतला. आदिवासींबद्दलच्या चांगल्या भावनेतून हा निर्णय घेतला आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन आम्ही निर्णय घेतला. असं संजय राऊत यांनी बोलताना म्हटलं आहे.

पुढे बोलतानाच संजय राऊत म्हणाले की, नंदूरबार, धुळे, मेळघाटमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आमचे अनेक आमदार आदिवासी आहेत. त्याभागातून निवडून आले आहेत. त्यांच्या भावना समजून घेऊन हा निर्णय घेतला आहे, असंही संजय राऊत म्हणाले. (President Election 2022)

Sanjay Raut Latest News, President Election 2022, Draupadi Murmu Latest News
दुचाकी स्लिप होऊन भीषण अपघात; चिमुकल्याला वाचवताना आईचा गेला जीव

द्रौपदी मुर्मू या मागास भागातून आल्या आहेत. त्या राष्ट्रपती व्हाव्यात ही राष्ट्राची भावना आहे. त्यामुळे निवडणुका आणि राजकीय फायद्या तोट्याचं गणित आम्ही पाहिलेलं नाही, असंही संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, आज मुंबईत एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. आपण या बैठकीला जाणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, 'आम्ही एनडीएत नाही. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही एनडीएत नाही. तरीही एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे', असं राऊत यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. (Draupadi Murmu Latest News)

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com