दुचाकी स्लिप होऊन भीषण अपघात; चिमुकल्याला वाचवताना आईचा गेला जीव

शारदा मुकेश बांगर असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे आहे.
Akola Bike Accident
Akola Bike AccidentSaam TV
Published On

अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी अपघाताच्या (Accident) घटना समोर येत आहेत. अशातच ट्रिपलशीट दुचाकी स्लिप होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला. आपल्या पती अन् मुलाबरोबर दुचाकीवरून प्रवास करीत असतांना खराब रस्त्यामुळे दुचाकी स्लिप झाली. अन् चिमुकल्यासह दोघे पती पत्नी रस्त्यावर कोसळले. (Akola Bike Accident News)

Akola Bike Accident
हद्दच झाली! ३५ वर्षीय विवाहित महिलेचं अल्पवयीन मुलावर जडलं प्रेम; घरी बोलावून केलं धक्कादायक कृत्य

यादरम्यान, आपल्या 2 वर्षाच्या मुलाला वाचवताना महिलेला जीव गमवावा लागला. शारदा मुकेश बांगर असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील टाकळी खोजबोळ येथील मुकेश बांगर पत्नी शारदासह 2 वर्षीच्या चिमुकल्याला घेऊन दुचाकीने उरळ ते मनसगांव मार्गाने प्रवास करीत होते. यादरम्यान, निंबा फाटयाजवळ आज सकाळच्या सुमारास त्यांची दुचाकी स्लिप झाली. अन् चिमुकल्यासह दोघे पती पत्नी रस्त्यावर कोसळले.

या अपघातून शारदा यांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलाला वाचविले. मात्र, दुर्देवाने त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने शारदा यांना तातडीने उपचारासाठी जिल्ह्यातील उरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. शारदा यांचे पती मुकेश बांगर आणि मुलगा सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत झाली.

Akola Bike Accident
धक्कादायक! एका महिलेसह २४ कैद्यांना HIV ने गाठलं; कारागृह प्रशासन हादरलं

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचलं अन् त्यात मातीही वाहून आली. यामुळे बांगर यांची दुचाकी स्लिप झाली अन् ही दुर्दैवी घटना घडली. मृतक शारदा बांगर यांना ७ आणि ५ वर्षाच्या दोन मुली असून २ वर्षाचा मुलगा देखील आहे. अचानक त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने बांगर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com