Anil Agarwal Son Dies Saam Tv
देश विदेश

Anil Agarwal Son Dies: आयुष्यात यापेक्षा वाईट काय असू शकते? प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या मुलाचा मृत्यू; भावनिक पोस्ट चर्चेत

Agnivesh Agarwal Dies After Skiing Accident: वेदांता ग्रुपचे चेअरमन संस्थापक अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचा अपघाती मृत्यू झाला. अमेरिकेत स्कीइंग करताना ते जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • वेदांता ग्रुपचे संस्थापक अनिल अग्रवाल यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला

  • मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेत निधन

  • स्कीइंग अपघातानंतर उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने निधन

  • अनिल अग्रवाल यांची भावनिक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

वेदांता ग्रुपचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल (४९ वर्षे) यांचे अमेरिकेत निधन झाले आहे. अग्निवेश हे वेदांत ग्रुपची कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेडच्या (टीएसपीएल) संचालक मंडळात सहभागी होते. अमेरिकेत स्कीइंग करताना ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. मुलाच्या निधनामुळे अनिल अग्रवाल यांना मोठा धक्का बसला. अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश हे अमेरिकेत स्कीइंग करण्यासाठी गेले होते. स्कीइंग करताना अपघात झाला.या अपघातानंतर अग्निवेश यांना न्यू यॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला होते. पण उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. अनिल अग्रवाल यांना अग्निवेश आणि प्रिया ही दोन मुले आहेत. त्यांची मुलगी प्रिया वेदांता ग्रुपच्या संचालक मंडळावर आहेत आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत.

बिहारची राजधानी पाटणा येथून जागतिक स्तरावर आपला व्यवसाय उभारणारे वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मुलाच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली. 'आज माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवस आहे. माझा ४९ वर्षांचा मुलगा अग्निवेश आता आपल्यात नाही. एका वडिलांनी आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाणे यापेक्षा वाईट काय असू शकते? अपघात झाला तेव्हा अग्निवेश एका मित्रासोबत अमेरिकेत स्कीइंगला गेला होता. तो न्यू यॉर्कमधील माउंट सिनाई हॉस्पिटलमध्ये बरा होत होता. आम्हाला वाटले होते की सर्व काही ठीक होईल. पण अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि आमचा मुलगा आम्हाला सोडून गेला.'

अनिल अग्रवाल यांनीही त्यांच्या मुलाच्या जीवन प्रवासाची कहाणी देखील पोस्टमध्ये सांगितली. त्यांनी लिहिले की, '३ जून १९७६ रोजी पाटणा येथे अग्निवेशचा जन्म झाला तो क्षण अजूनही माझ्य मनात ताजा आहे. माझा मुलगा अग्नि एका मध्यमवर्गीय बिहारी कुटुंबात जन्मला होता. पाटणा येथे त्याचा जन्म झाला होता. अग्निवेशने क्रीडा, संगीत आणि नेतृत्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांनी अजमेर येथील मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. नंतर त्यांनी फुजैराह गोल्डची स्थापना केली आणि हिंदुस्तान झिंकचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते त्यांच्या साध्या आणि संवेदनशील स्वभावासाठी ओळखले जात होते. अग्निवेश हा एक अतिशय साधा माणूस होता. तो नेहमीच त्याच्या मित्रांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये राहत असे. तो ज्याला भेटायचा त्याला तो स्वतःचे बनवत असे. तो प्रामाणिक, सरळ, सत्यवादी, चैतन्यशील आणि मानवतेने परिपूर्ण होता. तो फक्त माझा मुलगा नव्हता. तो माझा मित्र होता. तो माझा अभिमान होता. तो माझे संपूर्ण जग होता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aawaj Maharashtra Pune: 'निवडणुका इव्हेंट मॅनेजमेंट झाल्या, आश्वासनांपलीकडे विकास हवा'

नाईक करणार शिंदेंचे घोडे बेपत्ता? नवी निवडणूक, जुनी दुश्मनी

मुंबई महाराष्ट्राची नाही, भाजप नेत्यानं ओकली गरळ

Maharashtra Live News Update: दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू

मला अडकवण्याचा प्रयत्न होता; CM फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप, VIDEO

SCROLL FOR NEXT