Shocking: लग्नाला दिला नकार, महिला डॉक्टरची आत्महत्या; विषारी इंजेक्शन घेत संपवलं आयुष्य

Telangana Crime: तेलंगणामध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केली. वरिष्ठ डॉक्टरने लग्नाला नकार दिल्यामुळे या महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे तेलंगणात खळबळ उडाली आहे.
Shocking: लग्नाला दिला नकार, महिला डॉक्टरची आत्महत्या; विषारी इंजेक्शन घेत संपवलं आयुष्य
Telangana CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • तेलंगणाच्या सिद्धिपेटमध्ये २३ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या

  • वरिष्ठ डॉक्टरने लग्नास नकार दिल्याचा आरोप

  • पोलिसांनी आरोपी डॉक्टरला केली अटक

  • मेडिकल कॉलेज परिसरात संतापाचे वातावरण

तेलंगणाच्या सिद्धिपेट जिल्ह्यात एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. सिनिअर डॉक्टरने लग्न करायला नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन घेत आयुष्य संपवलं. सिद्धिपेट जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ही २३ वर्षीय महिला डॉक्टर कार्यरत होती. या घटनेमुळे तेलंगणामध्ये खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी रोजी या महिला डॉक्टरने कॉलेजच्या वसतिगृहामध्ये स्वत:ला विषारी इंजेक्शन दिले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. वसतिगृहातील तिच्या मैत्रिणींनी तिला सिद्धिपेट येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तिची प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे तिला हैदराबाद येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान ४ जानेवारी रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला.

Shocking: लग्नाला दिला नकार, महिला डॉक्टरची आत्महत्या; विषारी इंजेक्शन घेत संपवलं आयुष्य
Shocking: महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी सेक्स रॅकेट, पोलिसांनी ८ तरुण-तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या बहिणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. या तक्रारीत तिने सांगितले की, 'डॉक्टरने माझ्या बहिणीला सांगितले की तो तिच्याशी लग्न करणार नाही.' या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वरिष्ठ निवासी डॉक्टरला अटक केली. पोलिस सध्या पुढील तपास करत असून ते आरोपी डॉक्टरची चौकशी करत आहेत.

Shocking: लग्नाला दिला नकार, महिला डॉक्टरची आत्महत्या; विषारी इंजेक्शन घेत संपवलं आयुष्य
Shocking: दिल्ली हादरली! बापलेकाला नग्न करत अमानुष मारहाण, आरोपींनी महिलेलाही सोडलं नाही; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनी सांगितले की, ही महिला डॉक्टर जोगुलंबा-गडवाल जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील होती. तिने एका समाज कल्याण शाळेत शिक्षण घेतले आणि २०२० मध्ये सिद्धिपेट येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतला. ती सध्या हाऊस सर्जन म्हणून काम करत होती. खूप मेहनत करत ती डॉक्टर झाली होती. तिचे पालक रोजंदारीवर काम करतात. तिची मोठी बहीण सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. या घटनेमुळे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shocking: लग्नाला दिला नकार, महिला डॉक्टरची आत्महत्या; विषारी इंजेक्शन घेत संपवलं आयुष्य
Shocking: डोक्यात ३ गोळ्या झाडल्या, नंतर गळा चिरला; बांगलादेशमध्ये हिंदू पत्रकाराची निर्घृण हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com